महेश मांजरेकरांच्या थोरल्या लेकीला पाहिलंत का? तीसुद्धा आहे अभिनेत्री; दिसायला आहे Bold & Beautiful

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 07:00 IST2022-04-08T07:00:00+5:302022-04-08T07:00:01+5:30

प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांची थोरली लेक बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते.

Did you see Mahesh Manjrekar's eldest daughter? She is also an actress; Looks Bold & Beautiful | महेश मांजरेकरांच्या थोरल्या लेकीला पाहिलंत का? तीसुद्धा आहे अभिनेत्री; दिसायला आहे Bold & Beautiful

महेश मांजरेकरांच्या थोरल्या लेकीला पाहिलंत का? तीसुद्धा आहे अभिनेत्री; दिसायला आहे Bold & Beautiful

प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. त्यांची पत्नी मेधा मांजरेकर (Medha Manjarekar) यादेखील अभिनेत्री आहेत. तर या दोघांना सई, अश्वमी आणि सत्या ही तीन मुले आहेत. याशिवाय त्यांना आणखी एक लेक आहे. ती म्हणजे गौरी इंगवले. सई, सत्या आणि गौरी हे तिघेही सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यामुळे हे तिघे चर्चेत येत असतात. तर सई मांजरेकर (Saiee Manjarekar) बऱ्याचदा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच सईने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, त्यात ती खूपच स्टनिंग दिसते आहे. 

सई मांजरेकरच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एथनिक आणि वेस्टर्न लूकमधील फोटो पाहायला मिळत आहेत. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोवर चाहतेच नाही तर सेलिब्रेटींनीदेखील कमेंट्स केल्या आहेत. 


अभिनेत्री सई मांजरेकर हिने दबंग ३ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिने सलमान खान सोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली. 


दबंग ३ नंतर सई मांजरेकर आयुष शर्मासोबत ‘मांझा’ या गाण्यात पहायला मिळाली. या गाण्यातील आयुष आणि सईची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली होती.याशिवाय ती मेजर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २७ मेला रिलीज होणार आहे. याशिवाय ती घानी या चित्रपटात झळकणार आहे. 

Web Title: Did you see Mahesh Manjrekar's eldest daughter? She is also an actress; Looks Bold & Beautiful