​ आरोह वेलणकर सांगतोय, लोक फक्त तमाशाच पाहतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 16:18 IST2017-01-06T16:18:02+5:302017-01-06T16:18:02+5:30

 पुण्यामध्ये नुकतेच अभिनेता आरोह वेलणकरला एका विचित्र प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. दोन अज्ञात दारु पिलेल्या माणसांनी भर रस्त्यात ...

Calling mountaineering, people see only Tamasha | ​ आरोह वेलणकर सांगतोय, लोक फक्त तमाशाच पाहतात

​ आरोह वेलणकर सांगतोय, लोक फक्त तमाशाच पाहतात

 
ुण्यामध्ये नुकतेच अभिनेता आरोह वेलणकरला एका विचित्र प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. दोन अज्ञात दारु पिलेल्या माणसांनी भर रस्त्यात आरोहला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना आरोह सांगतोय, मी संध्याकाळी पाचच्या सुमारास रस्त्यच्या कडेला माझी गाडी पार्क करुन थांबलो होतो. तेवढ्यात वरुन दोन जण कार मधुन आले आणि जोरजोरात हॉर्न वाजवायला लागले. मी गाडी बाजुला घेतली. तरी त्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एकजण गाडीतून खाली उतरुन मला मारण्याचा प्रयत्न करु लागला तेवढ्यात मी गाडीची काच वर केली. त्या दोघांनीही जवळपास दहा मिनिटे तिथे तमाशा घातला. बरंच लोक आजुबाजुला जमले होते. परंतू त्यातील एकजण देखील यामध्ये पडला नाही. सर्वजण फक्त आमचा तमाशाच पाहत होते. मी त्या दोघांवर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन रितसर गुन्हा दाखल केला आहे. सध्या ते दोघेही पोलिस कोठडीत आहेत. मला माझ्या घरच्यांनी व मित्रांनी सांगितले तु यामध्ये पडु नकोस तक्रार दाखल करु नकोस. पण जर सगळ््यांनीच असा विचार केला तर अशा लोकांना कोण धडा शिकवणार. खुलेआम दादागिरी करीत फिरणाºया या लोकांना वेळीच जरब बसविली पाहिजे. आणि म्हणुनच मी तक्रार नोंदविली. नुकतीच आपण बेंगळुर मधील घटना पाहीली आहे. तिथे देखील असेच झाले लोक फक्त तमाशा पाहतात पण मदतीला कोण येत नाही. मी आजपर्यंत असे प्रसंग केवळ सिनेमा, व्हीडीओ मध्येच पाहिले होत. पण माझ्यासोबत देखील ही घटना घडल्याने याचे गांभीर्य मला चांगलेच समजले आहे. अशा लोकांना धडा शिकविण्यासाठी आपणच हिंमत केली पाहिजे.  
      

Web Title: Calling mountaineering, people see only Tamasha