"उजव्या बाजूने मोठी कार आली आणि..."; किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 10:52 IST2026-01-13T10:51:35+5:302026-01-13T10:52:26+5:30
किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत घडलेला प्रकार सांगितला आहे

"उजव्या बाजूने मोठी कार आली आणि..."; किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात, नेमकं काय घडलं?
अभिनेत्री किशोरी शहाणे या हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. किशोरी शहाणेंना आपण विविध मालिका, सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलं आहे. किशोरी शहाणेंबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. किशोरी शहाणेंनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती सर्वांना सांगितली आहे. जाणून घ्या काय घडलं
किशोरींच्या गाडीचा अपघात कसा झाला?
किशोरी शहाणेंनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांच्या गाडीचा साईड मिरर तुटलेला दिसतोय. किशोरी सांगतात की, ''इतरांचं जे नुकसान होतं त्याबद्दल जरा संवेदनशीलतेने बाळगा... एक मोठी कार माझ्या उजव्या बाजूने आली, माझ्या कारचा आरसा तोडला आणि सिग्नलवरून उजवीकडे वळून वेगाने निघून गेली. हे बघून खूप दुःख झालं..''
''आपण सगळेच आपल्या आयुष्यात व्यस्त आहोत, पण तुम्हाला उशीर होत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही बेदरकारपणे गाडी चालवून दुसऱ्याचं नुकसान करावं. आजकाल कोणाकडेच वेळ नसतो.. आता पुन्हा मेकॅनिककडे जा, ते दुरुस्त करून घ्या, यामुळे उगाच मानसिक ताण वाढला आहे. यात माझी काहीच चूक नव्हती!", अशा शब्दात किशोरी शहाणेंनी त्यांचा संताप व्यक्त केला.