CM एकनाथ शिंदे कारमध्ये बसताच मनीष पॉलने घेतली 'ड्रायव्हिंग सीट', Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 10:58 IST2024-04-12T10:57:52+5:302024-04-12T10:58:32+5:30

व्हिडिओ पाहून नेटकरी मात्र मनीष पॉलवर नाखूष

Manish Paul drives CM Eknath Shinde home spotted at Kalina Airport video viral | CM एकनाथ शिंदे कारमध्ये बसताच मनीष पॉलने घेतली 'ड्रायव्हिंग सीट', Video व्हायरल

CM एकनाथ शिंदे कारमध्ये बसताच मनीष पॉलने घेतली 'ड्रायव्हिंग सीट', Video व्हायरल

हिंदी अभिनेता, होस्ट मनीष पॉल (Manish Paul) त्याच्या विनोद बुद्धीने नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. कित्येक अवॉर्ड सोहळ्यांमध्ये मनीष पॉलचंच सूत्रसंचालन असतं. त्याचा हजरजबाबीपणा, ऑन द स्पॉट विनोद करणं या टॅलेंटमुळे तो आज सर्वांचाच लाडका बनला. नुकतंच मनीष मुंबईच्या कलिना विमानतळावर दिसला. त्याच्यासोबत महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेही होते. कॅमेऱ्यासमोर पोज दिल्यानंतर मनीष पॉलने चक्क मुख्यमंत्र्यांची गाडी चालवली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

काल रात्री मनीष पॉल आणि सीएम एकनाथ शिंदे कलिना विमानतळाच्या बाहेर आले. टीशर्ट, जीन्स, डेनिम जॅकेट आणि स्पोर्ट्स शूज अशा लूकमध्ये मनीषने एन्ट्री घेतली. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही होते. दोघांनी कॅमेऱ्यासमोर पोज दिली. नंतर एकनाथ शिंदे त्यांच्या कारमध्ये ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले. तर मनीष पॉलने चक्क 'ड्रायव्हिंग सीट'च हातात घेतली. मुख्यमंत्र्यांची कार मनीष पॉल चालवतोय हे बघून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. मनीष त्यांच्या निवासस्थानापर्यंत गेला.  सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव यांच्या इन्स्टाग्राम पेजवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही कमेंट करत आश्चर्य व्यक्त केलंय. 'अरे ते मुख्यमंत्री आहेत. मोठेपणा, ओळख दाखवण्यासाठी लोक काय काय करतात','मनीष खूपच शो ऑफ करतोय' अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी मनीष पॉलला सुनावलं आहे. 

Web Title: Manish Paul drives CM Eknath Shinde home spotted at Kalina Airport video viral