सिंगल की रिलेशनशिपमध्ये ? चाहत्याच्या प्रश्नाला श्रुती हसनने दिले उत्तर, म्हणाली, 'मी सध्या…'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 08:41 AM2024-05-24T08:41:47+5:302024-05-24T08:56:56+5:30

श्रुतीने नुकतेच इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग' सेशन घेतलं होतं.

Kamal Haasan Daughter Shruti Haasan talk about her relationship status Confirms Her Breakup With Santanu Hazarika After 4 Years Of Dating | सिंगल की रिलेशनशिपमध्ये ? चाहत्याच्या प्रश्नाला श्रुती हसनने दिले उत्तर, म्हणाली, 'मी सध्या…'

सिंगल की रिलेशनशिपमध्ये ? चाहत्याच्या प्रश्नाला श्रुती हसनने दिले उत्तर, म्हणाली, 'मी सध्या…'

Bollywood Actress : श्रुती ही दिग्गज अभिनेते कमल हसन (Kamal Hassan) आणि सारिका यांची मुलगी असल्याने तिची आणखी ओळख सांगण्याची गरज नाही. मात्र, कमल हसन यांची मुलगी असूनही तिने सिनेक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रुतीचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते जीवाचा आटापीटा करतात. गेल्या काही दिवसांपासून श्रुती आणि तिचा बॉयफ्रेंड शंतनू यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे श्रुतीच्या रिअल लाईफ आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना स्वस्थ बसू देत नाहीये. मग काय, एका चाहत्याने सोशल मीडियावर श्रुतीला याबद्दल प्रश्न विचारला आहे.

श्रुतीने नुकतेच इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग' सेशन घेतलं होतं. त्यावेळी तिला विचारण्यात आले की ती सिंगल आहे की कोणासोबत कमिटेड आहे?. चाहत्याच्या या प्रश्नावर श्रुती म्हणाली, 'मला अशा प्रश्नांची उत्तरं द्यायला आवडत नाहीत, पण मी पूर्णपणे सिंगल आहे. मला आता रिलेशनशिपमध्ये यायचं नाही. सध्या मी काम करतेय आणि माझे आयुष्य एन्जॉय करतेय'. श्रुतीच्या या उत्तरावरुन तिचं शंतनूचं ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट झालं आहे. 

श्रुती-शंतनूच्या ब्रेकअपची बातमी गेल्या महिन्यात आली होती. जवळपास ४ वर्षांपासून श्रुती आणि शंतनू रिलेशनशिपमध्ये होते आणि ब्रेकअपआधी ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही होते. गेल्या महिन्यात दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलेले. त्याचबरोबर श्रुतीने शंतनू आणि तिचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओही तिच्या इंस्टाग्रामवरून हटवले आहेत. अशा परिस्थितीत दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून दोघांचे ब्रेकअप झाल्याचे मानले जात आहे. शंतनूआधी श्रुतीने धनुष, नागा चैतन्य आणि सिद्धार्थ अशा आघाडीच्या कलाकारांना डेट केल्याची चर्चा होती.  श्रुती हासनच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती अभिनेता प्रभाससोबत 'सालार' या सिनेमात झळकली होती.

Web Title: Kamal Haasan Daughter Shruti Haasan talk about her relationship status Confirms Her Breakup With Santanu Hazarika After 4 Years Of Dating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.