मी बोल्ड ड्रेस घातला तर तुमचं काय गेलं?, मीडियावर भडकली सोनम कपूर

By Admin | Updated: March 4, 2017 13:16 IST2017-03-04T12:41:57+5:302017-03-04T13:16:46+5:30

चुकीच्या पद्धतीने फोटो छापल्याने अभिनेत्री सोनम कपूरने इंग्रजी वृत्तपत्रावर संताप व्यक्त करत, चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

If I put a bold dress, what happened to you ?, Sonam Kapoor stirred the media | मी बोल्ड ड्रेस घातला तर तुमचं काय गेलं?, मीडियावर भडकली सोनम कपूर

मी बोल्ड ड्रेस घातला तर तुमचं काय गेलं?, मीडियावर भडकली सोनम कपूर

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 4 - बॉलिवूडची मस्कली गर्ल सोनम कपूर सडेतोड प्रतिक्रिया देण्यासाठी प्रसिद्धी आहे. मग तिच्या रेड कार्पेटवरील स्टाईलवर झालेली टीका असो किंवा मग स्वतःचे विचार रोखठोकपणे मांडणं असो, यामध्ये सोनम कधीच मागे नसते. नुकतीच तिने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. ज्यात तिने काळ्या रंगांचा जम्पसुट घातला होता. ज्यात ती खूपच मादक दिसत होती. या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या प्रसिद्धी माध्यमांपैकी एका इंग्रजी वृत्तपत्राने सोनमचे बोल्ड अवतारातील फोटो छापून सोनमला तिच्या कपड्यांमुळे वावरण्यात अडचण होत असल्याचे दिसत आहे, असे छापले होते 
 
यावर सोनम भलतीच संतापली व तिने सोशल मीडियावर ट्विटरवरुन संबंधित वृत्तपत्राला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. 
'मी माझ्या कपड्यांमध्ये अगदी आरामात वावरत होते. मी तेथे अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर संवाद साधला मात्र साहजिकच आहे तुम्हाला याच गोष्टीचे रिपोर्टींग करायचे होते'. 'फोटोग्राफरने माझे चुकीच्या पद्धतीने फोटो काढले, मात्र स्पष्ट सांगायचे तर यामुळे मला काहीही फरक पडत नाही. मला स्वतःच्या शरीरावर गर्व आहे'.
 
दरम्यान, या प्रकरणात सोनमला ब-याच अभिनेत्री ट्विट करत समर्थनही दिले.   
 

 

Web Title: If I put a bold dress, what happened to you ?, Sonam Kapoor stirred the media