केट बेकिंस्ले म्हणतेय, मद्यपान करणे सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 18:33 IST2017-01-01T18:33:29+5:302017-01-01T18:33:29+5:30

अभिनेत्री केट बेकिंस्ले हिची मद्यपानाची सवय बहुतेकांना माहीत आहे. कारण तिला बºयाचदा पार्टीत बेभान होताना बघितले गेले आहे. त्यामुळे ...

Kate Beckinsley says, quit drinking | केट बेकिंस्ले म्हणतेय, मद्यपान करणे सोडले

केट बेकिंस्ले म्हणतेय, मद्यपान करणे सोडले

िनेत्री केट बेकिंस्ले हिची मद्यपानाची सवय बहुतेकांना माहीत आहे. कारण तिला बºयाचदा पार्टीत बेभान होताना बघितले गेले आहे. त्यामुळे तिला टीकेचाही सामना करावा लागला आहे. तिची मद्यपानाची सवय तिच्या करिअरसाठी घातक ठरत असल्याची चर्चा रंगताना, त्यावर सारवासारव करण्यासाठी केटने स्पष्टीकरण दिले आहे.

ती म्हणाली की, मी एका घोटापेक्षा अधिक मद्यपान केलेले नाही. कारण मला लवकरच नशा होत असल्याचे मी जाणून असल्याने मी नेहमीच स्वत:वर कंट्रोल ठेवले आहे. फिमेलफर्स्ट डॉट कॉम डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ‘शेप’ या साप्ताहिकात मुलाखत देताना केट म्हणाली होती की, मी मद्यपान करीत नाही. कारण मला लवकरच नशा चढते. त्यामुळे मी कधीच एक पूर्ण ग्लास मद्य प्राशन केले नाही. एव्हाना आता तर मी मद्यपान पूर्णत: सोडले नाही. कारण मला सुदृढ जीवनशैली हवी आहे. ‘अंडरवर्ल्ड : नेक्ट जेनरेशन’ची स्टार असलेल्या केटला तिचा पहिला पती मायकल शीन याच्यापासून १७ वर्षाची मुलगी आहे. 

याविषयी केट म्हणते की, नशेपासून दूर राहण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी रोज सकाळी उठून मोकळ्या वातावरणात फिरायला जात आहे. सकाळी उठल्यानंतर नाष्टा करते. त्यानंतर वर्कआउट करायला जाते. मला वर्कआउट करायला खूप आवडते. मला सकाळी उठण्याची सवय असल्याने त्याचा परिणाम माझ्या प्रकृतीवर स्पष्टपणे दिसत आहे. मी सध्या सुदृढ जीवनशैलीचा अनुभव घेत आहे. 

Web Title: Kate Beckinsley says, quit drinking