Avatar 2 : ‘अवतार 2’ने बॉलिवूड, टॉलिवूड सर्वांनाच घाम फोडला; भारतात रेकॉर्डब्रेक कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 14:39 IST2023-01-05T14:38:37+5:302023-01-05T14:39:48+5:30
Avatar: The Way of Water : जगभरात ‘अवतार 2’ या सिनेमानं छप्परफाड कमाई केली. भारतातही विक्रमी गल्ला जमवला. आता तर हॉलिवूडच्या या सिनेमानं बॉलिवूड, टॉलिवूडलाही मागे टाकलं आहे.

Avatar 2 : ‘अवतार 2’ने बॉलिवूड, टॉलिवूड सर्वांनाच घाम फोडला; भारतात रेकॉर्डब्रेक कमाई
Avatar: The Way of Water box office collection : जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘अवतार’चा ‘अवतार 2’ (Avatar 2) हा सीक्वल आला आणि येताच या सिनेमानं नुसता धुमाकूळ घातला. जगभरात या सिनेमानं छप्परफाड कमाई केली. अगदी भारतातही विक्रमी गल्ला जमवला. आता तर हॉलिवूडच्या या सिनेमानं भारतात बॉलिवूड, टॉलिवूडलाही मागे टाकलं आहे.
पहिल्याच दिवशी 40 कोटी कमावणारा ‘अवतार 2’ तिसऱ्या आठवड्यातही गर्दी खेचतोय. वीकेंडमध्ये या सिनेमानं दमदार कमाई केली. भारतात मंगळवारपर्यंत या सिनेमाने 345.9 कोटी कमावले. काल बुधवारी 4 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. याचसोबत ‘अवतार 2’ची भारतातील एकूण कमाई 350 कोटींवर पोहोचली आहे.
‘कांतारा’ला मागे टाकलं...
2022 हे वर्ष नुकतंच सरलं. या वर्षात रिलीज झालेल्या चित्रपटांबद्दल बोलायचं तर यशचा ‘केजीएफ 2’ या चित्रपटाने सर्वाधिक 950 कोटी कमावले. पाठोपाठ ‘आरआरआर’ने 900 कोटींचा बिझनेस केला. ‘कांतारा’ या सिनेमा 345 कोटी कमावले. आता ‘अवतार 2’ने ‘कांतारा’ला मागे टाकलं आहे. ‘अवतार 2’ने 250 कोटींचा आकडा गाठला असून अद्यापही हा सिनेमा चित्रपटगृहांत आहे.
बॉलिवूडचे विक्रम मोडणार?
आमिरचा ‘दंगल’ हा बॉलिवूडचा सर्वाधिक कलेक्शन करणारा सिनेमा अहे. 2016 साली आलेल्या या सिनेमान 387 कोटी रूपयांची कमाई केली होती. मात्र ‘अवतार 2’ ज्या स्पीडने कमाई करतोय, ते बघता लवकरच ‘दंगल’चा विक्रम मोडणार, असं मानलं जात आहे. सध्यातरी बॉलिवूडचा कोणताच मोठा सिनेमा रिलीज झालेला नाही. शाहरूखचा ‘पठाण’ येतोय. पण त्याला अजून 20 दिवसांचा अवकाशा आहे. अशात ‘अवतार 2’ बॉलिवूडचे अनेक विक्रम मोडीत काढेल, अशी शक्यता आहे.
आत्तापर्यंत ‘अॅव्हेंजर्स- एंडगेम’ या सिनेमाने भारतात सर्वाधिक 373 कोटी कमाई केली होती. ‘अवतार 2’ने हा रेकॉर्ड मोडलाच तर हा सिनेमा भारतातील सर्वात मोठा हॉलिवूड सिनेमा असेल.