जीम कोर्टवरचा क्रिस हेम्सवर्थचा हा अंदाज तुम्हालाही लावेल वेड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 15:54 IST2019-01-15T15:47:55+5:302019-01-15T15:54:18+5:30
हॉलिवूड पडद्यावर ‘थॉर’ या फिल्मी सीरिजमुळे लोकप्रीय झालेला अभिनेता क्रिस हेम्सवर्थ सध्या जाम चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होतोय.

जीम कोर्टवरचा क्रिस हेम्सवर्थचा हा अंदाज तुम्हालाही लावेल वेड!
हॉलिवूड पडद्यावर ‘थॉर’ या फिल्मी सीरिजमुळे लोकप्रीय झालेला अभिनेता क्रिस हेम्सवर्थ सध्या जाम चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओतील क्रिसचा अंदाज कुणालाही वेड लावेल. या व्हिडिओत क्रिस शानदार वर्कआऊट करताना दिसतोय.
जीम कोर्टवरचा हा व्हिडिओ क्रिसने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. आत्तापर्यंत कोट्यवधी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
क्रिस हेम्सवर्थ अनेक हॉलिवूड चित्रपटांत दिसला. पण त्याला खरी ओळख दिली ती ‘थॉर’ सीरिजने. लवकरच क्रिस ‘अॅवेंजर्स’च्या चौथ्या भागातही दिसणारआहे. याशिवाय हॉलिवूडची प्रसिद्ध कॉमेडी व अॅक्शन फिल्म सीरिज एआयबी (मेन इन ब्लॅक)च्या चौथ्या सीक्वलमध्येही क्रिस झळकणार आहे.
या सीरिजच्या पहिल्या तीन भागांत विल स्मिथ आणि टॉमी ली जोन्स मुख्य भूमिकेत होते. पण ‘मेन इन ब्लॅक इंटरनॅशनल’ या चौथ्या सीक्वलमध्ये मात्र क्रिस हेम्सवर्थ आणि अभिनेत्री टेस्सा थॉम्पसन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या १४ जूनला प्रदर्शित होतोय.