५० देशांत प्रदर्शित होणार ‘हॉलीडे’'

By Admin | Updated: June 5, 2014 09:15 IST2014-06-05T09:15:33+5:302014-06-05T09:15:33+5:30

अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांची भूमिका असलेला ‘हॉलीडे’ हा चित्रपट येत्या ६ जूनला रिलीज होत आहे. फक्त भारतातच नव्हे, तर तब्बल ५० देशांत हा चित्रपट एकाचवेळी रिलीज होणार आहे.

'Holiday' to be displayed in 50 countries | ५० देशांत प्रदर्शित होणार ‘हॉलीडे’'

५० देशांत प्रदर्शित होणार ‘हॉलीडे’'

अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांची भूमिका असलेला ‘हॉलीडे’ हा चित्रपट येत्या ६ जूनला रिलीज होत आहे. फक्त भारतातच नव्हे, तर तब्बल ५० देशांत हा चित्रपट एकाचवेळी रिलीज होणार आहे. यात बॉलीवूडच्या नव्या मार्केटचाही समावेश आहे. हा चित्रपट ४०० इंटरनॅशनल स्क्रिन्सवर दाखवला जाईल. रिलायंस एंटरटेनमेंटच्या सीओओनुसार एवढ्या मोठ्या प्रमाणावर रिलीज होणारा हा अक्षय कुमारचा पहिलाच चित्रपट आहे. आम्ही ओवरसीज मार्केट शेअर वाढवत आहोत. चित्रपट आशिया आणि युरोपातील नव्या क्षेत्रांतही रिलीज होईल. स्पेनमध्ये दाखवला जाणारा हा पहिलाच बॉलीवूड चित्रपट असेल.

Web Title: 'Holiday' to be displayed in 50 countries