‘देऊळ बंद’चे शो वाढविणार

By Admin | Updated: August 6, 2015 23:20 IST2015-08-06T23:20:39+5:302015-08-06T23:20:39+5:30

स्वामी समर्थांच्या भूमिकेतील मोहन जोशी आणि डॅशिंग चेहरा गश्मीर महाजनी यांच्या अभिनयाच्या जुगलबंदी पाहाण्यासाठी प्रेक्षकांची पावले चित्रपटगृहाकडे वळत आहेत

'Dahal Band' will increase the show | ‘देऊळ बंद’चे शो वाढविणार

‘देऊळ बंद’चे शो वाढविणार

स्वामी समर्थांच्या भूमिकेतील मोहन जोशी आणि डॅशिंग चेहरा गश्मीर महाजनी यांच्या अभिनयाच्या जुगलबंदी पाहाण्यासाठी प्रेक्षकांची पावले चित्रपटगृहाकडे वळत आहेत, ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’, असा पाठीवर हात ठेवणाऱ्या श्री स्वामी समर्थांचा भक्तगण अवघ्या महाराष्ट्रभर विखुरलेला आहे. भक्तांचा स्वामी समर्थांच्या प्रती असलेला आध्यात्मिक ओढा हे देखील चित्रपटाच्या यशस्विततेचे एक कारण असल्याचे दिसून येत आहे.
एखादा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला तरी तो पुढच्या शुक्रवारपर्यंत चित्रपटगृहात राहिल किंवा नाही याची शाश्वती देता येत नाही,’ ‘देऊळ बंद' ने हा समज पूर्णत: खोडून काढला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याचे सर्व शो हाऊसफुल्ल होण्याचा विक्रम त्याने प्रस्थापित केला आणि अजूनही आठवडा उलटला तरी चित्रपटाला रसिकांचा प्रतिसाद वाढतच चालला आहे. शनिवार-रविवार सोडून इतर दिवशीसुद्धा चित्रपटगृह गर्दीने ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात मल्टीप्लेक्ससह
गावांमधल्या एकपडदा चित्रपटगृहांमध्येही प्रेक्षक अलोट गर्दी करत आहेत. पुण्या -मुंबईसह विदर्भ आणि मराठवाड्यात एकाच वेळी गर्दी खेचून चित्रपटाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. येत्या शुक्रवारपासून महाराष्ट्रभरात या चित्रपटाचे शो वाढविण्यात येणार असून ज्या प्रेक्षकांना चित्रपट पाहता आला नाही त्यांना पुढील आठवड्यात चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

Web Title: 'Dahal Band' will increase the show