कोकेन घेणारी अभिनेत्री पडली तोंडघशी - शेखर सुमनचा कंगनाला टोला

By Admin | Updated: February 28, 2017 16:21 IST2017-02-28T16:17:05+5:302017-02-28T16:21:03+5:30

कोकेन घेणाऱ्या एका अभिनेत्रीवर तिच्याकडे नसलेल्या प्रसिद्धीचे ओझे होते. आता तीच अभिनेत्री तोंडघशी पडली , अशी टीका शेखर सुमन यांनी कंगनाचे नाव न घेता केली.

The cocaine-taking actress fell face - shekhar Suman's neck | कोकेन घेणारी अभिनेत्री पडली तोंडघशी - शेखर सुमनचा कंगनाला टोला

कोकेन घेणारी अभिनेत्री पडली तोंडघशी - शेखर सुमनचा कंगनाला टोला

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - बॉलिवूडची 'क्वीन' आणि तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवणारी गुणी अभिनेत्री कंगना राणौतचा बहुचर्चित ' रंगून' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. कंगनासह सैफ अली खान आणि शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाची हवा तर खूप झाली मात्र तिकीट बारीवर मोठा गल्ला मिळवण्यात चित्रपट अपयशी ठरला. या चित्रपटात कंगनाने  'ज्युलिया या थरारदृश्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रटसृष्टीतील तत्कालीन प्रसिद्ध अभिनेत्रीची' व्यक्तिरेखा साकारली होती. मात्र प्रेक्षकांनी चित्रपट पहायला फारशी गर्दी न केल्याने तो अयशस्वी ठरल्याचे चित्र दिसत आहे. कंगनाच्या चित्रपटाला मिळालेल्या अपयशामुळे बॉलिवूडसह मीडियातही विविध चर्चांना उधाण आले असून त्याच पार्श्वभूमीवर कंगनाचा माजी प्रियकर अध्ययन सुमन याचे वडील आणि अभिनेता शेखर सुमन यांनीही टीका करत तिला टोला हाणला आहे. 
' कोकेन घेणाऱ्या एका अभिनेत्रीवर तिच्याकडे नसलेल्या प्रसिद्धीचे ओझे होते. आता तीच अभिनेत्री तोंडघशी पडली आहे. यालाच काव्यात्मक न्याय म्हणावा लागेल’ असे ट्विट सुमन यांनी केले. त्यांच्या या उपरोधिक ट्विटमध्ये शेखर यांनी कोणाचाही स्पष्ट उल्लेख केलेला नसला तरीही त्यांचा रोख कंगनाकडेच असल्याचे समजते. एकेकाळी कंगना आणि शेखर सुमन यांचा मुलगा अभिनेता अध्ययन यांचे प्रेमसंबंध होते, मात्र काही काळांतच त्यांच्यात दुरावा आला अन ते वेगळे झाले. कंगना आपल्यावर काळी जादू करत असे, असा धक्कादायक आरोपही अध्ययनने केला होता. या सर्वांमुळे या प्रकरणाला एक काळी किनार लाभली होती. मात्र कंगनानेही गप्प न बसता त्यांना सडेतोड उत्तर दिले होते. त्यावेळी शेखर सुमन आपल्या मुलाच्या बचावार्थ उतरले होते. काळाच्या ओघात हे प्रकरण शांत झाले आणि कंगनाही तिच्या वैयक्तिक तसेच करीयरमध्ये पुढे निघून गेली. उत्तम अभिनयाच्या जोरावर तिने ३ राष्ट्रीय पुरस्कारही पटकावले. मात्र आता 'रंगून'च्या अपयशानंतर तिच्यावर टीका होत असून सुमन यांनीही तिला टोला हाणला. 
 

Web Title: The cocaine-taking actress fell face - shekhar Suman's neck