सीबीआय अधिका:याच्या भूमिकेत विवेक

By Admin | Updated: July 29, 2014 23:16 IST2014-07-29T23:16:41+5:302014-07-29T23:16:41+5:30

‘क्रिश-3’मध्ये विलेनची भूमिका निभावणारा विवेक ओबेरॉय ‘बँकचोर’मध्ये सीबीआय अधिका:याच्या भूमिकेत दिसणार आहे.

CBI officer: Vivek in the role of CBI | सीबीआय अधिका:याच्या भूमिकेत विवेक

सीबीआय अधिका:याच्या भूमिकेत विवेक

‘क्रिश-3’मध्ये विलेनची भूमिका निभावणारा विवेक ओबेरॉय ‘बँकचोर’मध्ये सीबीआय अधिका:याच्या भूमिकेत दिसणार आहे. यशराज बॅनरच्या या चित्रपटातून कॉमेडियन कपिल शर्मा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार होता, पण त्याच्या जागी आता रितेश देशमुखची वर्णी लागली आहे. तब्बल 12 वर्षानी विवेक यशराज बॅनरच्या चित्रपटात दिसणार आहे. रितेश आणि विवेक यांनी ‘मस्ती’ आणि ‘ग्रँडमस्ती’ अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘बँकचोर’ ही तीन मूर्ख व्यक्तींची कहाणी आहे. हे तिघे चुकीच्या दिवशी ‘बँकेवर’ दरोडा टाकायला जातात आणि पुढे त्यांच्यासोबत अनेक वाईट घटना घडतात. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होण्याची शक्यता आहे.
 

 

Web Title: CBI officer: Vivek in the role of CBI