​तुम्ही आम्ही करायला हवे, ते प्रियंकाने केले!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 21:20 IST2016-07-10T15:50:39+5:302016-07-10T21:20:39+5:30

प्रियंका चोपडा एक अभिनेत्री म्हणून जितकी चांगली आहे, तितकीच एक व्यक्ति म्हणूनही चांगली आहे. याचा प्रत्यय अलीकडेच आला. पीसी ...

You should have done it, it was dear to you !! | ​तुम्ही आम्ही करायला हवे, ते प्रियंकाने केले!!

​तुम्ही आम्ही करायला हवे, ते प्रियंकाने केले!!

रियंका चोपडा एक अभिनेत्री म्हणून जितकी चांगली आहे, तितकीच एक व्यक्ति म्हणूनही चांगली आहे. याचा प्रत्यय अलीकडेच आला. पीसी सध्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. अर्थात काही आठवड्यांपूर्वी पीसी भारतात आली होती. काही ब्रॅण्ड कमिटमेंट आणि बॉलिवूड प्रोजेक्टची कामे तिने या काळात मार्गी लावलीत. याचदरम्यान पीसीने दिल्लीत एक पार्टीही दिली. ही पार्टी होती पीसीला पद्मश्रीने गौरविण्यात आल्याबद्दल. यावर्षी पीसीला पद्मश्रीने गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा झाला आणि दुसºयाच दिवशी पीसीला हॉलिवूड प्रोजेक्टसाठी अमेरिकेला रवाना व्हावे लागले होते. त्यामुळे तिला याचा आनंद साजरा करता आला नव्हता. म्हणून अलीकडे भारतात आल्यानंतर आपल्या काही जवळच्या मित्रांसोबत पीसीने हा आनंद साजरा केला. पार्टी संपल्यावर खूप सारे अन्न उरलेले पीसीला दिसले. बहुतेकदा कॅटरर्स हे उरलेले अन्न फेकून देतात. पण पीसीने जातीने लक्ष घालत हे अन्न फेकून न देता गरिबांना वाटून देण्याची विनंती कॅटरर्सला केली. केवळ एवढेच नाही तर आपला पर्सनल स्टाफ पीसीने याकामी लावला. पार्टीतील उरलेले अन्न गरिब, बेघर लोकांमध्ये वाटण्यात आले. पीसी व्यक्ति म्हणूनही तितकीच चांगली आहे, त्याचाच हा पुरावा नाही का?
 

Web Title: You should have done it, it was dear to you !!