हर्षालीला करायचेय सलमान, कॅटसोबत काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 09:44 IST2016-04-27T04:14:32+5:302016-04-27T09:44:32+5:30

‘बजरंगी भाईजान’ मध्ये मुन्नीची भूमिका केल्यानंतर हर्षाली मल्होत्रा घराघरात पोहोचली. तिचा गोड चेहरा, उत्तम, निरागस अभिनय यांच्यामुळे ती सर्वत्र ...

Working with Salman Khan and Katrina Kaif | हर्षालीला करायचेय सलमान, कॅटसोबत काम

हर्षालीला करायचेय सलमान, कॅटसोबत काम

जरंगी भाईजान’ मध्ये मुन्नीची भूमिका केल्यानंतर हर्षाली मल्होत्रा घराघरात पोहोचली. तिचा गोड चेहरा, उत्तम, निरागस अभिनय यांच्यामुळे ती सर्वत्र प्रसिद्ध झाली. तिने सलमान खानसोबत काम केले आणि तिच्या करिअरला जोरदार सुरूवात झाली.

आता ती पुन्हा एकदा बॉलीवूडच्या प्रकाशझोतात आली आहे. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आले की, ‘ तुला अजून कोणासोबत काम करायला आवडेल?

तेव्हा ती म्हणाली,‘ मला सलमान खान, कॅटरिना कैफ आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत काम करायला नक्की आवडेल. आपल्याला एवढे तरी मानलेच पाहिजे की, तिची निवड अगदी उत्तम आहे. म्हणजे ज्या सेलिब्रिटी सध्या अग्रेसर आहेत त्यांच्यासोबतच तिला काम करावयाचे आहे. मात्र, ते तिघेही सध्या खुपच बिझी आहेत.

श्रद्धा ‘बाघी’ चित्रपटात लवकरच दिसणार आहे. तर कॅटरिना सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘बार बार देखो’ मध्ये दिसणार आहे. तसेच सलमान हा ‘सुल्तान’ च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

Web Title: Working with Salman Khan and Katrina Kaif