​सलमानने लूलियासमोर ठेवल्या या अटी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 18:55 IST2016-06-30T13:24:50+5:302016-06-30T18:55:34+5:30

रोमानियन ब्युटी लूलिया वंतूर हिच्यासोबतच्या रिलेशनशिपबाबत सलमान काहीही बोलायला तयार नाही. मात्र सलमान लूलियाच्या खरोखरीच प्रेमात पडलाय. इतकेच नाही ...

What are the conditions that Salman put in front of Luliya? | ​सलमानने लूलियासमोर ठेवल्या या अटी?

​सलमानने लूलियासमोर ठेवल्या या अटी?

मानियन ब्युटी लूलिया वंतूर हिच्यासोबतच्या रिलेशनशिपबाबत सलमान काहीही बोलायला तयार नाही. मात्र सलमान लूलियाच्या खरोखरीच प्रेमात पडलाय. इतकेच नाही तर यावेळी तो या रिलेशनबद्दल चांगलाच गंभीरही आहे. गेल्या वर्षभरापासून फिरंगी बेब लूलिया सलमानच्या चांगलीच जवळ आलीय आणि हे कपल येत्या वर्षाअखेरिस लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे. आता आम्ही सलमान व लूलियाबद्दल आणखी एक नवी बातमी घेऊन आलो आहोत. होय,सलमानच्या अतिशय जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानने लूलियासमोर अनेक अटी ठेवल्या आहेत. होय, लूलियाने कुठलाही बॉलिवूड अ‍ॅक्टर वा डायरेक्टरशी काम करू नये, ही सलमानची अट आहे. लूलिया केवळ सलमान वा त्याच्या प्रॉडक्शन हाऊससोबत काम करू शकेल. लूलिया ही रोमानियामध्ये टीव्ही अँकर आहे. हे काम करण्यास सलमानला काहीही हरकत नाही. पण याव्यतिरिक्त लूलिया सलमानसोबत मुंबईत सेटल झालीच तर बॉलिवूडमध्ये तिने काम करू नये, अशी सलमानची अट आहे. आता ही अट लूलियाला मान्य आहे, असेच आपण सध्या तरी समजू...

Web Title: What are the conditions that Salman put in front of Luliya?