...तर 'या' कारणामुळे झालं ब्रेकअप! विजय वर्माच ठरला कारणीभूत? तमन्नाच्या 'या' गोष्टीकडे केला कानाडोळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 14:09 IST2025-03-06T14:08:27+5:302025-03-06T14:09:09+5:30
सध्या बीटाऊनमध्ये तमन्ना आणि विजय वर्माच्या ब्रेकअपच्या चर्चा आहेत

...तर 'या' कारणामुळे झालं ब्रेकअप! विजय वर्माच ठरला कारणीभूत? तमन्नाच्या 'या' गोष्टीकडे केला कानाडोळा
बॉलिवूडमध्ये नेहमी चर्चेत असलेलं कपल तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि विजय वर्मा (Vijay Varma) यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. २ वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी नातं संपवायचं ठरवलं आहे. कित्येक फंक्शन, पार्टी, मूव्ही स्क्रीनिंगसाठी हातात हात घालून येणारी ही जोडी आता पुन्हा एकत्र दिसणार आहे. यामुळे त्यांचे चाहतेही निराश झाले आहेत. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या विजय आणि तमन्ना यांनी नक्की का ब्रेकअप केलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सध्या बीटाऊनमध्ये तमन्ना आणि विजय वर्माच्या ब्रेकअपच्या चर्चा आहेत. 'लस्ट स्टोरीज २' मध्ये दोघांनी स्क्रीन शेअर केली होती. यामध्ये त्यांनी इंटिमेट सीनही दिले होते. तेव्हापासून दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. इतकंच नाही तर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चाही होत्या. पण या चर्चाच त्यांच्या ब्रेकअपचं कारण ठरल्याचा अंदाज आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, तमन्ना विजयशी लग्न करण्यास उत्सुक होती. तिला नातं पुढे न्यायचं होतं. तर विजयला मात्र आताच लग्न करायचं नव्हतं. हेच त्यांच्यातील मतभेदाचं कारण ठरलं आणि त्यांच्यात बिनसलं. विजयला लग्न, संसाराची जबाबदारी घ्यायची नव्हती असंही रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. मात्र यात किती तथ्य आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांनी वेगळं होण्याच निर्णय घेतला असला तरी ते कायम एकमेकांचे मित्र असतील असंही त्यांनी ठरवलं आहे. त्यांचे चाहते मात्र या बातमीमुळे नाराज झाले आहेत. दरम्यान दोघंही रिलेशनशिपमध्ये असताना विजयला अनेकदा ट्रोलही करण्यात आलं होतं. तमन्ना त्याची गर्लफ्रेंड आहे यावर अनेकांना विश्वासच बसत नव्हता. अद्याप ब्रेकअपच्या चर्चांवर दोघांकडूनही काहीच स्पष्टीकरण आलेलं नाही.