​विद्या बालनने मीना कुमारीचे बायोपिक का नाकारले, तुम्हाला ठाऊक आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 10:25 IST2017-11-08T04:55:55+5:302017-11-08T10:25:55+5:30

‘तुम्हारी सुलू’ हातावेगळा केल्यानंतर विद्या बालनकडे एका बायोपिकची आॅफर चालून आली होती. ‘गँग आॅफ वासेपूर’ सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक ...

Vidya Balan rejected Meena Kumari's biopic, do you know? | ​विद्या बालनने मीना कुमारीचे बायोपिक का नाकारले, तुम्हाला ठाऊक आहे?

​विद्या बालनने मीना कुमारीचे बायोपिक का नाकारले, तुम्हाला ठाऊक आहे?

ुम्हारी सुलू’ हातावेगळा केल्यानंतर विद्या बालनकडे एका बायोपिकची आॅफर चालून आली होती. ‘गँग आॅफ वासेपूर’ सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया यांनी ही आॅफर दिली होती. आॅफर कुठली तर ‘पाकिजा’ सारखा अजरामर चित्रपट करणारी अभिनेत्री मीना कुमारी हिच्या बायोपिकची. होय, धूलिया मीना कुमारी हिच्या आयुष्यावर बायोपिक बनवत आहे. या बायोपिकमध्ये मीना कुमारीची भूमिका विद्याला आॅफर केली गेली होती. मात्र या बायोपिकला विद्याने नकार दिला. मग काय? विद्याच्या नकारानंतर हा चित्रपट बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत हिच्या झोळीत पडला.



साहजिक विद्याने या चित्रपटाला नकार का दिला, हा खरा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर विद्या बालन हिनेच दिले आहे. विद्याच्या मते, या बायोपिकच्या स्क्रिप्टमध्ये मीना कुमारी यांच्यासोबत न्याय झालेला नाही. मी मीना कुमारीची खूप मोठी चाहती आहे, असे सांगत विद्या म्हणाली की,  मीना कुमारीसारख्या अजरामर नायिकेची भूमिका पडद्यावर साकारणे कुणाला आवडणार नाही? मलाही ते आवडले असते. पण स्क्रिप्ट केवळ सेंसेशनल नसावी. मीरा कुमारीवर बायोपिक आणायचे तर तिच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूला स्पर्श व्हायला हवा. केवळ सणसणाटी निर्माण करण्यासाठी सोयीचे तेवढेच दाखवले जाणार असेल तर मला ते नको आहे. मी ‘डर्टी पिक्चर’ केला. त्यातही सेंसेशन होते. पण ती सिल्क होती. प्रत्येक कॅरेक्टरबद्दल असे होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीचे बायोपिक हा खूप संवेदनशील विषय आहे आणि हा विषय तितकाच संवेदनशीलपणे हाताळला जायला हवा. योग्य कारणासाठी बायोपिक निर्माण व्हायला हवेत. विशेषत: हयात नसलेल्या व्यक्तिच्या आयुष्यावर बायोपिक बनत असेल तर त्यामागे योग्य कारण असायलाच हवे.  केवळ ‘देखना सब देखेंगे,’ या कारणासाठी बायोपिक तयार होऊ नयेत. म्हणूनच मी हे बायोपिक नाकारले.
विद्या म्हणतेयं त्यात निश्चितपणे  दम आहे. पण केवळ ‘कमाई’साठी चित्रपट काढणा-यांना विद्याचे हे विचार पचनी पडण्यासारखे नाही. त्यामुळेच विद्याच्या या विचारावर तिग्मांशू धूलिया कसे  रिअ‍ॅक्ट होतात, ते बघूच.

ALSO READ: बहिणीसाठी विद्या बालनने केला प्रेमाचा त्याग! वाचा विद्याच्या पहिल्या प्रेमाची गोष्ट!!
 

Web Title: Vidya Balan rejected Meena Kumari's biopic, do you know?