विकी कौशलचा वडिलांसोबत भांगडा, सून कॅटरिनाला आवरलं नाही हसू; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 10:00 IST2023-03-08T09:58:20+5:302023-03-08T10:00:05+5:30
दुसरीकडे विकी कौशलचे वडील शाम कौशल यांनी एक क्युट व्हिडिओ शेअर केला आहे.

विकी कौशलचा वडिलांसोबत भांगडा, सून कॅटरिनाला आवरलं नाही हसू; Video व्हायरल
अभिनेता विकी कौशल (Vikcky Kaushal) आणि पत्नी कॅटरिना कैफ(Katrina Kaif) दोघांनी आपल्या कुटुंबासोबत होळीचा सण उत्साहात साजरा केला. होळीच्या सणात रंगून गेल्याचे सुंदर फोटोही त्यांनी यावेळी सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंत केले. तर दुसरीकडे विकी कौशलचे वडील शाम कौशल (Sham Kaushal) यांनी एक क्युट व्हिडिओ शेअर केला आहे.
विकी कौशल पंजाबी कुटुंबात जन्माला आला आहे. त्याचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमध्ये स्टंटमॅन होते. आता ते निवृत्त झाले आहेत तर विकी मोठा स्टार झाला आहे. होळीनिमित्ताने विकी आणि वडील शाम कौशल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये शाम कौशल विकीसोबत भांगडा करताना दिसत आहेत. आणि त्यांचा हा व्हिडिओ कौशल कुटुंबाची सून कॅटरिना कैफ रेकॉर्ड करत आहे. कॅटरिना रेकॉर्डिंग करताना हसत आहे.
हॅपी होली!असं कॅप्शन देत शाम कौशल यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. विकीने आई वडील आणि पत्नीसोबत होळीचे सेलिब्रेशन केले. या फोटोंध्ये कॅटरिनाची बहिण इझाबेलाही दिसत आहे. चाहत्यांनी या फोटोंना खूपच पसंत केले आहे. काही तासांतच फोटोंना अनेक लाईक्स मिळाले आहेत.
कॅटरिनाचा लवकरच 'टायगर ३' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर विकी कौशल लक्ष्मण उतेकरच्या फिल्ममध्ये दिसणार आहे. मात्र फिल्मचे टायटल अजून ठरलेले नाही.