'अशी सून मिळाली म्हणून आई खूपच खूश...' विकी कौशलने सांगितल्या कतरिनाच्या 'या' सवयी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 12:11 PM2024-03-18T12:11:42+5:302024-03-18T12:12:35+5:30

कतरिना कैफचं सासूसोबत असं आहे नातं...

Vicky Kaushal reveals his mom is happy because her daughter in law eats tinde and surai like vegetables | 'अशी सून मिळाली म्हणून आई खूपच खूश...' विकी कौशलने सांगितल्या कतरिनाच्या 'या' सवयी

'अशी सून मिळाली म्हणून आई खूपच खूश...' विकी कौशलने सांगितल्या कतरिनाच्या 'या' सवयी

बॉलिवूडची लोकप्रिय जोडी विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) कायम चर्चेत असतात. सध्या कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या अफवांना उधाण आलं आहे. पंजाबी कुटुंबातील सून झाल्यावर कतरिना विकीच्या घरात कशी रमली याचा विकीने खुलासा केला आहे.  विकी मुंबईत त्याच्या भाऊ आणि आईवडिलांसोबतच राहतो. लग्नानंतर कतरिनाही वेगळी न राहता सासू सासऱ्यांसोबतच राहत आहे. कतरिनाशी लग्न झाल्यानंतर आयुष्यात बरेच बदल झाल्याचंही तो म्हणाला. 

'द वीक'शी बातचीत करताना विकी म्हणाला, "लग्नानंतर आता 'मी' ची 'आपण'ने घेतली आहे. आपण स्वत:चा नाही तर कुटुंबाचा विचार करुन पुढे जातो. त्यामुळे आमच्या दोघांमध्येही आता मी पणा राहिलेला नाही. माझा भाऊ माझ्याहून १ वर्ष ४ महिन्याने छोटा आहे. त्यामुळे आम्ही मित्र म्हणूनच जास्त राहतो. ना तो मला काही सल्ला देतो आणि ना मी त्या देतो. आम्ही फक्त आमचा अनुभव शेअर करतो. तो माझ्यापेक्षा खूप शांत आणि समजूतदार आहे. तो जेवणही चांगलं बनवतो."

तो पुढे म्हणाला, "माझ्या प्रिय पत्नीला शाकाहारीच जास्त आवडतं. छोले भटुरे, आणि इतरही पंजाबी पदार्थ तिला आवडतात. माझी आई तर खूपच खूश आहे जिला टिंडे, बीन्स, सुरई या भाज्या आवडणारी सून मिळाली. कतरिना तिच्या जेवणात या गोष्टी आधी घेते. याशिवाय तिला पॅनकेक खूप आवडतात."

वर्कफ्रंट

विकी कौशल सध्या 'छावा' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये तो छत्रपती संभाजीराजांची भूमिका साकारत आहे. रश्मिका मंदानासोबत त्याची जोडी आहे. याशिवाय आनंद तिवारींच्या एका सिनेमातही तो तृप्ती डिमरी आणि एमी विर्कसोबत झळकणार आहे. तर कतरिना फरहान अख्तरच्या आगामी 'जी ले जरा' मध्ये काम करणार आहे. 

Web Title: Vicky Kaushal reveals his mom is happy because her daughter in law eats tinde and surai like vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.