ज्या ठिकाणाची वाटते भीती तिथेच करावं लागलं लग्न, विकी कौशलचा अजब किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 03:09 PM2023-11-21T15:09:28+5:302023-11-21T15:12:16+5:30

विकी कौशलला नेमकी कशाची वाटते भीती?

Vicky Kaushal has wierd fear he gets affraid of heritage monuments had to get married at such place | ज्या ठिकाणाची वाटते भीती तिथेच करावं लागलं लग्न, विकी कौशलचा अजब किस्सा

ज्या ठिकाणाची वाटते भीती तिथेच करावं लागलं लग्न, विकी कौशलचा अजब किस्सा

'उरी' फेम अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) कोणत्या गोष्टीला घाबरत असेल यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. 'उरी' सारख्या सिनेमात दमदार अॅक्शन करताना दिसणारा विकी खऱ्या आयुष्यात प्राचीन वास्तूत राहायला घाबरतो. असं असूनही विकीला ऐतिहासिक वास्तूत केवळ शूटच करावं लागलं नाही तर उलट त्याने लग्नही अशाच वास्तूत केलं. 

विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानच्या सिक्स सेंसस फोर्टमध्ये लग्नबंधनात अडकले होते. या हॉटेलच्या जागी आधी सातशे वर्ष जुना किल्ला होता. ज्याला नंतर आलिशान हॉटेलमध्ये रुपांतरित करण्यात आलं. राजस्थानच्या सवाई माधोपुरमध्ये हे हॉटेल स्थित आहे. विकी आणि कतरिनाचं याचठिकाणी  9 डिसेंबर 2021 रोजी लग्नबंधनात अडकले होते.

एका टॉक शोमध्ये विकी म्हणाला होता की, 'मला अशा हॉटेल्समध्ये जायला भीती वाटते जे ऐतिहासिक जागी असतात. तिथे लावलेली जुनी पेंटिंग्स बघूनही मला भीती वाटते. एका फिल्मशूटसाठी मला अशा प्रकारच्या हॉटेलमध्ये राहावं लागलं होतं. जिथे मी अक्षरश: घाबरत घाबरत रात्र काढली होती. तसंच जेव्हा लाईट गेले तेव्हा जनरेटर ऑन होईस्तोवर माझी अवस्था वाईट झाली होती. 

विकी कौशलचा 'सॅम बहादुर' हा सिनेमा 1 डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. यामध्ये सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेखही मुख्य भूमिकेत आहेत. त्याच दिवशी रणबीर कपूरचा Animal सिनेमाही रिलीज होतोय. 

Web Title: Vicky Kaushal has wierd fear he gets affraid of heritage monuments had to get married at such place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.