"कतरिनापेक्षा चांगली हिरोईन मिळाली तर घटस्फोट देशील का? विकी म्हणतो, "मला आधी मोठं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 08:49 IST2023-05-16T08:48:00+5:302023-05-16T08:49:02+5:30
घटस्फोटाच्या प्रश्नावर विकीचं उत्तर

"कतरिनापेक्षा चांगली हिरोईन मिळाली तर घटस्फोट देशील का? विकी म्हणतो, "मला आधी मोठं..."
बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक म्हणजे कतरिना कैफ(Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांची जोडी. दोघंही एकमेकांसोबत खूपच गोड दिसतात. चाहत्यांची तर ही आवडती जोडी. पण नुकतंच विकी कौशलला असा काही प्रश्न विचारण्यात आला ज्याने खरं तर एखाद्याचा संताप झाला असता. मात्र तो विकीने तो प्रश्न खूपच गंमतीत घेतला.
विकी कौशल आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांचा 'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा येत आहे. सिनेमाचा काल ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. यामध्ये सारा आणि विकी नवरा बायको असून त्यांना घटस्फोट घ्यायचा असतो. तर ट्रेलर लॉंचप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना एकाने विकीला विचारलं,"आपल्या देशात लग्न म्हणजे साता जन्माचं नातं मानलं जातं. तुला हे योग्य वाटतं का, किंवा घटस्फोट घेऊन दुसरं लग्न योग्य वाटतं. तुला कतरिनापेक्षा चांगली हिरोईन मिळाली तर तिला घटस्फोट देशील का?"
या प्रश्नावर विकीला आधी हसू येतं. तो गंमतीत म्हणतो,"मला नंतर घरीही जायचं आहे. अजून मी लहान आहे, मला मोठं तर होऊ द्या. किती खतरनाक प्रश्न विचारलाय याने." यानंतर विकी म्हणतो,"सर जन्मोजन्मी पर्यंत." विकीच्या या उत्तराने मग सर्वांचं मन जिंकलं.
पत्रकाराच्या या प्रश्नावर बाजूला बसलेल्या सारा अली खानला तर धक्काच बसतो. तिच्या चेहऱ्यावरुन तिला किती आश्चर्य वाटतंय हे दिसतं.