विजय सेतुपती व कतरिना कैफच्या ‘मेरी ख्रिसमस’चं ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी चित्रपट होणार रीलिज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 07:54 PM2023-12-20T19:54:59+5:302023-12-20T19:57:01+5:30

'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

Trailer of Vijay Sethupathi and Katrina Kaif's 'Merry Christmas' Released | विजय सेतुपती व कतरिना कैफच्या ‘मेरी ख्रिसमस’चं ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी चित्रपट होणार रीलिज

विजय सेतुपती व कतरिना कैफच्या ‘मेरी ख्रिसमस’चं ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी चित्रपट होणार रीलिज

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती व बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'मेरी ख्रिसमस' लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये कतरिना आणि विजयची जबरदस्त रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

रमेश तौरानी, ​​जया तौरानी, ​​केवल गर्ग आणि संजय रौट्री यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. तर श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात कतरिना आणि विजयसोबत संजय कपूर, विनय पाठक, टिनू आनंद हे सहाय्यक भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात राधिका आपटे आणि अश्विनी काळसेकर यांच्या भूमिका आहेत. 

'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे. श्रीराम राघवनचा हा चित्रपट क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. या सिनेमाची कतरिना आणि विजयचे चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. या चित्रपटातील दोन्ही स्टार्सचा उत्कृष्ट अभिनय तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे, हे ट्रेलरवरून स्पष्ट झाले आहे.
 

Web Title: Trailer of Vijay Sethupathi and Katrina Kaif's 'Merry Christmas' Released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.