पुन्हा एकदा एकत्र आले ' भूल भुलैया'चे त्रिकुट, मार्चपासून शूटिंगला होणार सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 08:44 PM2024-01-05T20:44:10+5:302024-01-05T20:45:09+5:30

'भुलभुलैया २'(Bhool Bhulaiya 2)च्या यशानंतर प्रेक्षकांना 'भुलभुलैया ३'(Bhul Bhulaiya 3)ची प्रतीक्षा आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा कार्तिक आर्यन (Kartik Aryan) दिसणार असल्याची बातमी आल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

The trio of 'Bhool Bhulaiya' reunited once again, Karthik Aryan is coming to scare and laugh in the movie | पुन्हा एकदा एकत्र आले ' भूल भुलैया'चे त्रिकुट, मार्चपासून शूटिंगला होणार सुरूवात

पुन्हा एकदा एकत्र आले ' भूल भुलैया'चे त्रिकुट, मार्चपासून शूटिंगला होणार सुरूवात

'भुलभुलैया २'(Bhool Bhulaiya 2)च्या यशानंतर प्रेक्षकांना 'भुलभुलैया ३'(Bhool Bhulaiya 3)ची प्रतीक्षा आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा कार्तिक आर्यन (Kartik Aryan) दिसणार असल्याची बातमी आल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला कधी सुरुवात होणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. त्यानुसार मार्च महिन्यात 'भुलभुलैया ३'च्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याची योजना निर्माते भूषण कुमार आणि दिग्दर्शक अनीस बाज्मी यांनी आखली आहे. 

या हॅारर कॉमेडीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केल्याचं सांगत भूषण कुमार म्हणाले की, क्रिएटिव्ह माईंड असलेल्या अनीस आणि प्रचंड टॅलेंटेड कार्तिकसोबत 'भुलभुलैया'चा प्रवास पुढे सुरू ठेवताना खूप आनंद होत आहे. या दोघांच्या साथीने पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजक अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यासाठी सज्ज झाल्याचंही भूषण कुमार म्हणाले.

कियारा आणि तब्बू दिसणार का?
कार्तिक आर्यन चित्रपटात नक्कीच असणार हे या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे. पण भूल भुलैया २ मध्ये दुहेरी भूमिकेत दिसलेली कियारा अडवाणी आणि तब्बूही त्याच्यासोबत असतील का? मीडिया रिपोर्ट्सनुसार, तब्बू या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचा भाग नसण्याची शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, तब्बूला तीच भूमिका पुन्हा करण्यात रस नाही. तर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की तब्बूकडे आधीपासूनच काही प्रोजेक्ट्स आहेत ज्यामुळे ती या चित्रपटाचा भाग होऊ शकत नाही. तथापि, तब्बू आणि कियारा आडवाणी या चित्रपटाचा भाग असल्याबद्दल कोणतीही पुष्टी झालेली नाही.
 

Web Title: The trio of 'Bhool Bhulaiya' reunited once again, Karthik Aryan is coming to scare and laugh in the movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.