'स्त्री' युनिव्हर्समधील 'थामा' या पुढील सिनेमाची घोषणा! आयुषमान-रश्मिका प्रमुख भूमिकेत; रिलीज डेटही जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 15:28 IST2024-10-30T15:27:17+5:302024-10-30T15:28:50+5:30

'स्त्री' युनिव्हर्समधील पुढील सिनेमाची दिवाळीच्या मुहुर्तावर घोषणा! आयुष्मान-रश्मिका प्रमुख भूमिकेत

thama movie announcement after Stree 2 horror comedy universe on the occasion of Diwali 2025 | 'स्त्री' युनिव्हर्समधील 'थामा' या पुढील सिनेमाची घोषणा! आयुषमान-रश्मिका प्रमुख भूमिकेत; रिलीज डेटही जाहीर

'स्त्री' युनिव्हर्समधील 'थामा' या पुढील सिनेमाची घोषणा! आयुषमान-रश्मिका प्रमुख भूमिकेत; रिलीज डेटही जाहीर

'स्त्री' सिनेमाच्या माध्यमातून हॉरर कॉमेडी युनिव्हर्सची सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत या युनिव्हर्समध्ये 'भेडीया', 'मुंज्या' आणि 'स्त्री २' हे सिनेमे प्रदर्शित झाले. या तीनही सिनेमांना प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळालं. यावर्षी १५ ऑगस्टच्या मुहुर्तावर रिलीज झालेल्या 'स्त्री २' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करुन ५०० कोटींच्या वर कमाई केलीय. आज नुकतंच दिवाळीच्या मुहुर्तावर 'स्त्री २' या हॉरर युनिव्हर्सच्या पुढील सिनेमाची घोषणा केलीय. 'थामा' असं या सिनेमाचं नाव आहे. त्याविषयाची अधिकृत घोषणा आज करण्यात आलीय. 

'थमा' सिनेमाची दिवाळीच्या मुहुर्तावर घोषणा

"ही एक लव्हस्टोरी आहे पण... रक्तरंजित" अशी टॅगलाईन पोस्ट करुन 'थामा' सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आलीय. आजवरच्या हॉरर युनिव्हर्समधील हा प्रेमकथेनी युक्त असलेला हा सिनेमा लय भारी असणार यात शंका नाही. या सिनेमात चार प्रमुख कलाकार भूमिका साकारताना दिसणार आहेत. आयुषमान खुराना, रश्मिका मंदाना हे दोघे सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. तर नवाझुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल हे अभिनेतेही विशेष भूमिकेत दिसणार आहेत.


या दिवशी रिलीज होणार थामा

आज दिवाळीच्या मुहुर्तावर सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. पुढील वर्षी अर्थात २०२५ मध्ये 'थामा' हा सिनेमा रिलीज होणार आहे. २०२५ मध्ये दिवाळीच्या मुहुर्तावर 'थमा' रिलीज होणार आहे. 'स्त्री', 'भेडीया', 'मुंज्या', 'स्त्री २' नंतर 'थामा' सिनेमा या हॉरर युनिव्हर्सचा पुढील भाग असणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. आदित्याने याच युनिव्हर्समधील 'मुंज्या' सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

 

Web Title: thama movie announcement after Stree 2 horror comedy universe on the occasion of Diwali 2025