Tere Ishq Mein X Review: क्रिती सनॉनचा करिअरमधील बेस्ट सिनेमा! लोकांना कसा वाटला धनुषचा 'तेरे इश्क में'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:53 IST2025-11-28T12:51:59+5:302025-11-28T12:53:12+5:30
धनुष आणि क्रिती सनॉन या जोडीचा 'तेरे इश्क में' हा सिनेमा आज रिलीज झालाय. हा सिनेमा पाहून लोकांनी कशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाणून घ्या

Tere Ishq Mein X Review: क्रिती सनॉनचा करिअरमधील बेस्ट सिनेमा! लोकांना कसा वाटला धनुषचा 'तेरे इश्क में'?
धनुष (Dhanush) आणि क्रिती सनॉन (Kriti Sanon) यांचा बहुचर्चित चित्रपट 'तेरे इश्क में' (Tere Ishk Mein) आज, २८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा होती आणि प्रदर्शनानंतर लगेचच थिएटरमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. पहिला शो पाहून आलेल्या लोकांनी सोशल मीडियावर वर चित्रपटाचे रिव्ह्यू देण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद
उत्कृष्ट प्रेम कहाणी: 'तेरे इश्क में' या चित्रपट पाहून प्रेक्षक आणि समीक्षकांनी २०२५ च्या सर्वोत्कृष्ट प्रेम कहाण्यांपैकी एक म्हणून संबोधले आहे. ही एक अतिशय आकर्षक लव्ह स्टोरी असून, त्यात हृदयस्पर्शी क्षण आणि एक जबरदस्त क्लायमॅक्स असल्याचं सांगितलं जात आहे.
Best romantic movie of this year
— kushsingh (@AvadhrajSi18492) November 28, 2025
What movie yaar
Kriti Sanon phenomenal as always
Dhanush sir stel the show
Just wow , 200crore club coming soon
Plz go to watch The movie#TereIshqMein#TereIshkMein#TereIshkMeinReview#KritiSanon#Dhanushpic.twitter.com/7Qf4TY4ig1कलाकारांचे काम:धनुष आणि क्रिती सनॉन या नव्या जोडीतील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली आहे. दोघांनीही आपल्या भूमिकांना न्याय दिला असून, खासकरून क्रिती सनॉनच्या अभिनयाला तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी म्हणून ओळखले जात आहे. धनुषने आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे.
#TereIshkMeinReview - first half
— thamee_thammu (@Thamee_thammu) November 28, 2025
🔥🔥🔥🔥🔥
Blockbuster written all over❤️❤️🔥
Tamil dubbing at best📈💯
ARR🚀❤️🔥
If the same continues for the second half then sky is the limit💯#dhanush#TereIshqMein#TereIshkMeinसोशल मीडियावरील प्रतिक्रिया: चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेकजण 'तेरे इश्क में' हा चित्रपट प्रेमात असणाऱ्या जोडप्यांचं हृदय स्पर्शून जाणारा सिनेमा आहे, असं म्हटलं आहे. त्यामुळे 'रांझणा'नंतर आनंद.एल.राय आणि धनुष या जोडीचा हा नवा सिनेमा प्रेक्षकांना भावला आहे. इतकंच नव्हे क्रितीच्या अभिनयाचंही कौतुक झालंय.
It’s Mukti day, y’all!🥹❤️🔥 The day we’ve been waiting for is finally here🥳 #TereIshqMein is in cinemas now. Sending my best wishes to you, Kritsu. I know you’ll shine; we loved every single character you played, and this is the best performance you’ll ever have.🙌💗@kritisanonpic.twitter.com/l27Exg9Z09
— kritiger_love_birds (@kritiger__jassi) November 28, 2025
'तेरे इश्क में' सिनेमाबद्दल अधिक माहिती
'तेरे इश्क में' या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. राय यांनी केले आहे आणि संगीत ए.आर. रहमान यांचे आहे. या दमदार टीममुळे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत होता. 'दो पत्ती' नंतर क्रिती सनॉनचा या वर्षातील हा पहिला मोठा चित्रपट असल्याने तिच्या चाहत्यांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या.
गुलशन कुमार, टी-सीरीज आणि कलर येलो प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली बनलेला 'तेरे इश्क में' हा चित्रपट आनंद एल. राय यांनी दिग्दर्शित केला आहे, तर हिमांशू शर्मा आणि नीरज यादव यांनी लेखन केले आहे. ए.आर. रहमान यांचे संगीत आणि इरशाद कामिल यांनी लिहिलेली गाणी असलेला हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये जगभरात रिलीज झाला आहे.