बोल्ड अवतारात अनन्या पांडेचा बिकीनी लूक व्हायरल,मालदीव्हजमध्ये करते एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 02:20 PM2022-01-13T14:20:00+5:302022-01-13T14:23:29+5:30

अनन्या पांडेने (Ananya Pandey) करण जोहरच्या (Karan Johar) 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात ती तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफसोबत दिसली होती. यानंतर तिने कार्तिक आर्यनसोबत 'पति पत्नी और वो'मध्ये काम केले Eus.

Super Stylish Ananya Pandey Bikini Photos Flaunt Printed Red Two Piece In Maldives | बोल्ड अवतारात अनन्या पांडेचा बिकीनी लूक व्हायरल,मालदीव्हजमध्ये करते एन्जॉय

बोल्ड अवतारात अनन्या पांडेचा बिकीनी लूक व्हायरल,मालदीव्हजमध्ये करते एन्जॉय

googlenewsNext


अभिनेता चंकी पांडेची मुलगी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे( Ananya Pandey) ही इंडस्ट्रीतील स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे.ती दररोज सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोशूट शेअर करत असते. स्टारकिड असलेली अनन्यानेही अभिनयाच्या जोरावर स्वतःला सिद्ध केले आहे. अल्पावधीतच तिलाही रसिकांची पंसती मिळाली होती. तसेच चांगल्या भूमिकांच्या ऑफर मिळाव्यात याच प्रयत्नात ती असते. तुर्तास पुन्हा एकदा अनन्या चर्चेत आली आहे. 

सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असून तिचा मोठा चाहता वर्ग आहे. पुन्हा एकदा तिने इन्स्टाग्रामवर लेटेस्ट बिकिनी फोटोशूट शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती जबरदस्त स्टाईलमध्ये दिसत आहे. बिकिनीमध्ये किलर पोज देताना अनन्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.या फोटोंमध्ये अनन्या पांडे प्रिंटेड ऑफ शोल्डर बिकिनी घालून मस्त पोज देताना दिसत आहे. मालदीवमध्ये ती तिचे व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.

विशेष म्हणजे  काही तासांतच अनन्या पांडेच्या या फोटोंना ७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये सगळेच तिच्या लूकला पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनन्या पांडेचे इंस्टाग्रामवर 20 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.स्टारकिड्सपैकी अनन्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्टार्सपैकी एक आहे.

अनन्या पांडेने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात ती तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफसोबत दिसली होती. यानंतर तिने कार्तिक आर्यनसोबत 'पति पत्नी और वो'मध्ये काम केले. अनन्या पांडेचा शेवटचा चित्रपट 'खाली-पीली' होता जो 2020 साली OTT वर  रिलीज झाला होता.अनन्या पांडेचा आगामी चित्रपट 'लाइगर' आहे. 'लाइगर'मध्ये ती पहिल्यांदाच साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटातील तिचा लूकही रिलीज करण्यात आला आहे.

Web Title: Super Stylish Ananya Pandey Bikini Photos Flaunt Printed Red Two Piece In Maldives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.