सनी लिओनीचा ‘ढाई किलो का हाथ’ सोशल मीडियावर झाला व्हायरल, तुम्हीही पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 16:00 IST2018-02-09T10:29:59+5:302018-02-09T16:00:34+5:30

सनी लिओनीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत असून, त्यामध्ये तिचा अतिशय डॅशिंग अंदाज बघावयास मिळत आहे.

Sunny Leone's 'two kilogram hand' on social media viral, you see! | सनी लिओनीचा ‘ढाई किलो का हाथ’ सोशल मीडियावर झाला व्हायरल, तुम्हीही पाहाच!

सनी लिओनीचा ‘ढाई किलो का हाथ’ सोशल मीडियावर झाला व्हायरल, तुम्हीही पाहाच!

लिवूडची आयटम गर्ल सनी लिओनी हिने काहीही केले तरी त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगतेच. सध्या सनी तिच्या साउथ एंट्रीमुळे चर्चेत आहे. साउथच्या एका चित्रपटात ती यौद्धाच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे. ‘वीरमादेवी’ असे तिच्या या चित्रपटाचे नाव असून, नुकतेच तिने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा स्वत: सनीनेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट केली आहे. त्याचबरोबर तिने एक फोटोही शेअर केला. ज्यामध्ये तिने सनी देओलचा प्रसिद्ध डायलॉग ‘ढाई किलो का हाथ’चा वापर केल्याचे दिसून येत आहे. 

सनीने हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘शपथ घेऊन सांगते मी हाथ आवरता घेतला नाहीतर सर्व विटांचा खच जमनीवर पडला असता... सनी लिओन... ढाई किलो का हाथ.’ सनीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जात आहे. सनीने हा फोटो शेअर करताच काही वेळातच त्यास असंख्य लाइक्स मिळाल्या आहेत. 
 

काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, सनी लिओनीचा मेणाचा पुतळा लवकरच दिल्ली येथील मॅडम तुसाद संग्रहालयात बसविण्यात येणार आहे. जेव्हा ही बातमी सनीला कळाली तेव्हा ती चांगलीच उत्साहित झाली होती. सध्या सनी तिची इमेज बदलण्याचा प्रयत्न करीत असून, त्यासाठी तिने साउथ इंडस्ट्रीत आपला मोर्चा वळविला आहे. ‘वीरमादेवी’ या चित्रपटात ती जबरदस्त अंदाजात बघावयास मिळणार आहे. तिचा हा चित्रपट तामिळ व्यतिरिक्त अन्य भाषांमध्येही रिलीज केला जाणार आहे. चित्रपटात ती वीरमादेवीची भूमिका साकारताना बघावयास मिळेल. या चित्रपटाला ऐतिहासिक टच देण्यात आला असून, त्यामध्ये तुफान अ‍ॅक्शन बघावयास मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन वीसी वैदियुदैयान करीत असून, पोंस स्टेफिन निर्माता आहेत. 

Web Title: Sunny Leone's 'two kilogram hand' on social media viral, you see!