श्रीदेवी यांचे पार्थिव दुबई विमानतळावर पोहोचले, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 18:30 IST2018-02-27T13:00:20+5:302018-02-27T18:30:28+5:30

सुपरस्टार श्रीदेवी यांचे पार्थिव अखेर मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपूर परिवाराने सर्व कायदेशीर प्रक्रिया ...

Sridevi's body reached Dubai airport, see photo! | श्रीदेवी यांचे पार्थिव दुबई विमानतळावर पोहोचले, पाहा फोटो!

श्रीदेवी यांचे पार्थिव दुबई विमानतळावर पोहोचले, पाहा फोटो!

परस्टार श्रीदेवी यांचे पार्थिव अखेर मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपूर परिवाराने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून, श्रीदेवीच्या बॉडीला संरक्षक लेप लावून बॉडी परिवाराकडून सोपविली आहे. दरम्यान, सध्या कपूर परिवार श्रीदेवीचे पार्थिव घेऊन दुबई विमानतळाच्या दिशेने रवाना झाले असून, त्याचे काही फोटोज् समोर आले आहे. 

श्रीदेवी यांचे पार्थिव विमानतळावर आणल्यानंतर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या प्रायव्हेट जेटने भारतात आणले जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री १० वाजेच्या दरम्यान श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणले जाण्याची शक्यता आहे. श्रीदेवी यांच्या पार्थिवासोबत पती बोनी कपूर आणि मुलगा अर्जुन कपूर आहे. सुरुवातीला बोनी कपूरच गेल्या शनिवारपासून दुबईत होते. आज सकाळी अर्जुन कपूर दुबईला रवाना झाला होता. 
 
दरम्यान, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर श्रीदेवी यांच्या शरीरास संरक्षक लेप लावण्यात आला. मृत शरीर अधिक काळ सुरक्षित रहावे याकरिता संरक्षक लेप लावला जातो. दरम्यान, श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत येणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांचे चाहते सातत्याने त्यांच्या घराबाहेर गर्दी करीत आहेत. केवळ चाहतेच नव्हे तर बॉलिवूड इंडस्ट्रीतील बरेचसे बडे कलाकारही याठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. श्रीदेवीच्या दोन्ही मुलींचे सेलिब्रिटींकडून सांत्वन केले जात आहे. 

Web Title: Sridevi's body reached Dubai airport, see photo!