एकेकाळी ड्वेन ब्राव्हो करत होता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट; चर्चा होताच दोघंही झाले विभक्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 15:05 IST2022-07-05T15:04:18+5:302022-07-05T15:05:09+5:30

Dwayne bravo: क्रिकेटच्या मैदानात प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणाऱ्या ब्राव्होच्या नजरा एकेकाळी एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर खिळल्या होत्या.

south actress and dwayne bravo spotted on a secret lunch date | एकेकाळी ड्वेन ब्राव्हो करत होता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट; चर्चा होताच दोघंही झाले विभक्त?

एकेकाळी ड्वेन ब्राव्हो करत होता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट; चर्चा होताच दोघंही झाले विभक्त?

बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रांचा जवळचा संबंध असल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. आतापर्यंत अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी प्रसिद्ध क्रिकेटपटूंसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील सेलिब्रिटी आणि त्यांच्या रिलेशनशीपची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते. सध्या सोशल मीडियावर वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो (dwayne bravo) याची चर्चा रंगली आहे. आपल्या उत्तम खेळीमुळे चर्चेत येणारा ब्राव्हो यावेळी रिलेशनशीपमुळे चर्चेत येत आहे.

क्रिकेटच्या मैदानात प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणाऱ्या ब्राव्होच्या नजरा एकेकाळी एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर खिळल्या होत्या. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने साऊथसह बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे आज तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. सध्या सोशल मीडियावर या दोघांची चर्चा रंगली असून त्यांची लव्हस्टोरी चर्चेत येत आहे.

एकेकाळी ब्राव्हो लोकप्रिय अभिनेत्री श्रिया सरन (shriya saran) हिला डेट करत असल्याचं म्हटलं जातं. या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. याविषयी नेटकऱ्यांमध्ये चर्चाही रंगली होती. मात्र, या नात्याविषयी दोघांनीही कायम मौन बाळगलं होतं. विशेष म्हणजे बराच काळ एकत्र राहिल्यावर ही जोडी विभक्त झाल्याचं सांगण्यात येतं.

दरम्यान, या दोघांच्या नात्याविषयी अद्यापही ठोस माहिती कोणालाही माहित नसून ते एकमेकांना डेट करायचे या चर्चांनी बराच वेग धरला होता. श्रिया सरनचं आता लग्न झालं असून तिला एक बाळदेखील आहे. तसंच ब्राव्होनेही त्याचा संसार थाटला आहे. श्रिया कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने इष्टम या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. तसंच साऊथसह तिने दृश्यम या ब्लॉकबस्टर बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे.
 

Web Title: south actress and dwayne bravo spotted on a secret lunch date