आलिया भट्टच्या 'कान्स'मधील ट्रोलिंगवरुन सोनी राजदानची पोस्ट; म्हणाल्या, "इतका द्वेष..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 15:00 IST2026-05-17T14:53:14+5:302026-05-17T15:00:14+5:30

आलिया भट्टच्या बाजूने उभं राहत सोनी राजदान यांनी सोशल मीडियावरील वाढत्या नकारात्मकतेवर चिंता व्यक्त केली आहे.

soni razdan hits back at trollers who trolled alia bhatt cannes film festival 2026 | आलिया भट्टच्या 'कान्स'मधील ट्रोलिंगवरुन सोनी राजदानची पोस्ट; म्हणाल्या, "इतका द्वेष..."

आलिया भट्टच्या 'कान्स'मधील ट्रोलिंगवरुन सोनी राजदानची पोस्ट; म्हणाल्या, "इतका द्वेष..."

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री आलिया भट्ट सध्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' २०२६ मधील तिच्या एकापेक्षा एक ग्लॅमरस लुक्समुळे जगभरात चर्चेत आहे. कान्सच्या रेड कार्पेटवरील आलियाच्या फोटोंवर चाहते फिदा झाले असले, तरी सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या एका वर्गाने तिला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली. या ट्रोलिंगला आलियाने स्वतः चोख प्रत्युत्तर दिले होतेच, पण आता या वादात आलियाची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री सोनी राजदान यांनी उडी घेतली असून त्यांनी लेकीच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली आहे.

आलिया भट्टच्या बाजूने उभं राहत सोनी राजदान यांनी सोशल मीडियावरील वाढत्या नकारात्मकतेवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "सोशल मीडियावर प्रेम, माहिती आणि मनोरंजनाचा खजिना नक्कीच आहे, पण त्याच सोबतीने तिथे प्रचंड प्रमाणात द्वेषही पाहायला मिळतो." सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडिया हे आपल्या समाजाच्या मानसिकतेचा आणि विचारसरणीचा आरसा बनले आहे, असे म्हणत सोनी राजदान यांनी या गंभीर विषयावर समाजाने सखोल आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे मत मांडले.

काही दिवसांपूर्वी कान्स फेस्टिव्हलमधील आलिया भट्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यावरून ट्रोलर्सनी तिच्यावर निशाणा साधला. एका युझरने नकारात्मक कमेंट करत लिहिले होते, 'किती दुःखद गोष्ट आहे, तिथे उपस्थित असलेल्या कोणाचेच तुझ्याकडे लक्ष नव्हते आणि कोणी तुला नोटीसही केले नाही.' ट्रोलरच्या या खोचक कमेंटवर आलिया भट्ट शांत बसली नाही, तिने सडेतोड उत्तर देत लिहिले, 'यात दुःख वाटण्यासारखं काय आहे? तू तर मला नोटीस केलंस ना!' आलियाच्या या चतुर आणि सडेतोड उत्तराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.

आलिया भट्टच्या त्या उत्तराचा स्क्रीनशॉट आणि सोनी राजदान यांनी सोशल मीडियाच्या मानसिकतेवर केलेली ही थेट टिप्पणी सध्या मनोरंजन विश्वात चांगलीच व्हायरल होत आहे. आलियाच्या चाहत्यांनी सोनी राजदान यांच्या या भूमिकेचे कौतुक केले असून कलाकारांना विनाकारण ट्रोल करणाऱ्यांना यामुळे चांगलीच चपराक बसल्याचे म्हटले आहे. सध्या कान्स २०२६ मधील आलियाचे नवनवीन लूक आणि या वादावर बॉलिवूडमधूनही अनेक सेलिब्रिटी आलियाला पाठिंबा देत आहेत.

Web Title : कान्स ट्रोलिंग के बाद सोनी राजदान ने आलिया भट्ट का समर्थन किया, नफरत की निंदा की।

Web Summary : आलिया भट्ट को कान्स में ट्रोल किया गया। माँ सोनी राजदान ने उनका बचाव किया, सोशल मीडिया की नकारात्मकता की आलोचना की। आलिया ने चतुराई से ट्रोलर्स को जवाब दिया, जिससे ऑनलाइन चर्चा और सेलेब्रिटी समर्थन मिला।

Web Title : Soni Razdan supports Alia Bhatt after Cannes trolling, slams hate.

Web Summary : Alia Bhatt faced Cannes trolling. Mom Soni Razdan defended her, criticizing social media negativity. Alia cleverly responded to trolls, sparking online discussion and celebrity support.