व्हिडीओ घेऊ नका...! वडिलांना घेऊन रुग्णालयातून बाहेर पडताना श्रद्धा कपूर पापाराझींवर भडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:37 IST2026-01-03T12:36:31+5:302026-01-03T12:37:15+5:30
अभिनेत्री श्रद्धा कपूर नुकतीच वडील शक्ती कपूर यांना घेऊन मुंबईतील रुग्णालयात पोहोचली होती.

व्हिडीओ घेऊ नका...! वडिलांना घेऊन रुग्णालयातून बाहेर पडताना श्रद्धा कपूर पापाराझींवर भडकली
अभिनेत्री श्रद्धा कपूर नुकतीच वडील शक्ती कपूर यांना घेऊन मुंबईतील रुग्णालयात पोहोचली. शक्ती कपूर यांची तब्येत तर ठीक आहे ना? असे प्रश्न चाहत्यांना पडले. काही वेळाने श्रद्धा शक्ती कपूर यांच्यासोबत बाहेर पडली. दोघांनी चेहऱ्याला मास्क लावला होता. त्यांचा व्हिडीओ घेण्यासाठी पापाराझी रुग्णालयाबाहेर होते. मात्र श्रद्धाने दुरुनच पापाराझींना व्हिडीओ घेण्यास मनाई केली. यावेळी ती जरा चिडलेलीही दिसली.
श्रद्धा कपूर आणि वडील शक्ती कपूर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय शक्ती कपूर यांनी गुलाबी टीशर्ट आणि शॉर्ट्स घातली आहे. डोक्यावर कॅप आणि चेहऱ्याला मास्क लावला आहे. तर श्रद्धा कपूर शॉर्ट कुर्ती आणि जीन्समध्ये आहे.तिनेही मास्क लावला आहे. शक्ती कपूर यांची ती काळजी घेताना दिसत आहे. त्यांना कारमध्ये बसवत आहे.
यानंतर श्रद्धा पापाराझींना बघून चिडते. ती दुरुच व्हिडीओ घेऊ नका असा इशारा करते. इतर वेळी पापाराझींसमोर हसत खेळत असणारी श्रद्धा कपूर यावेळी मात्र काहीशी भडकलेली दिसली. या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनीही श्रद्धाची बाजू घेतली आहे. त्यांच्या वैयक्तिक आयु्ष्यात प्रत्येक वेळी दखल देणं गरजेचं नाही अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
श्रद्धा कपूर सध्या 'छावा'फेम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. 'ईठा' असं सिनेमाचं नाव आहे. लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर सिनेमा आधारित आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या शूटवेळी श्रद्धा कपूरच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला दोन आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.