लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:46 IST2025-10-30T16:46:00+5:302025-10-30T16:46:46+5:30
शाहरुख खानने आपल्या स्टाईलमध्ये दिलं भन्नाट उत्तर

लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननेबॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं आहे. अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून त्याने करिअरला सुरुवात केली आहे. त्याची पहिलीच सीरिज 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'ने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. प्रेक्षकांना सीरिज भलतीच आवडली. आपल्या पहिल्याच सीरिजमध्ये आर्यनने शाहरुख, सलमान, आमिर, इम्रान हाश्मी, राजामौली, अर्शद वारसी, रणबीर कपूर, करण जोहर अशा दिग्गजांचे कॅमिओ घेतले आहेत. दरम्यान लेकाच्या सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून काम करणार का? या प्रश्नावर शाहरुख खानने नुकतंच उत्तर दिलं आहे.
शाहरुख खान अनेकदा ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधतो. त्यांच्या प्रश्नांना एकदम स्मार्ट उत्तरं देतो. एका चाहत्याने त्याला विचारलं, 'लेकाने दिग्दर्शित केलेल्या एखाद्या सिनेमात आम्ही तुला पाहू का?'यावर शाहरुख म्हणाला, 'जर त्याला मी परवडणार असेल तर...आणि माझे नखरेही'.
If he can afford me!!! And my tantrums https://t.co/cNlBFPz4Vk
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 30, 2025
शाहरुख खानने नेहमीप्रमाणेच त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. यानंतर आणखी एका चाहत्याने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा दुसरा भाग येणार का? असं विचारलं. त्यावर शाहरुखने उत्तर देत लिहिले, 'काय केलं पाहिजे हे मुलांना सांगणं तसं कठीणच असतं. पण तो यावर काम करत असेल अशी मला खात्री आहे'.
शाहरुख खान आगामी 'किंग' सिनेमात दिसणार आहे. सध्या तो या सिनेमाचं शूट करत आहे. हा सिनेमा खास आहे कारण यामध्ये त्याच्यासोबत लाडकी लेक सुहाना खानही दिसणार आहे. पहिल्यांदाच बाप-लेक स्क्रीन शेअर करणार आहेत.