क्या बात! अंबानींच्या लग्नात मराठमोळा गायक संजू राठोडची एन्ट्री, 'गुलाबी साडी'वर नाचले वराती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 16:45 IST2024-07-14T16:43:04+5:302024-07-14T16:45:58+5:30

संजू राठोडच्या गुलाबी साडी गाण्याने राधिका-अनंत अंबानींचा लग्नाचा मंडपही गाजवला असं दिसतंय (sanju rathod, gulabi sadi)

sanju rathod perform gulabi sadi at anant ambani wedding dance video viral | क्या बात! अंबानींच्या लग्नात मराठमोळा गायक संजू राठोडची एन्ट्री, 'गुलाबी साडी'वर नाचले वराती

क्या बात! अंबानींच्या लग्नात मराठमोळा गायक संजू राठोडची एन्ट्री, 'गुलाबी साडी'वर नाचले वराती

'गुलाबी साडी' गाणं खूप गाजलं. संजू राठोडने गायलेलं 'गुलाबी साडी' गाणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडलं. या गाण्यावर खूप रील्स व्हायरल झाले. इतकंच नव्हे गायक संजू राठोडला या गाण्याच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्धी मिळाली. केवळ बॉलिवूड नाही तर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनाही 'गुलाबी साडी'ची भुरळ पडली. संजू राठोडसाठी एक खास गोष्ट अशी की, नुकत्याच झालेल्या अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात 'गुलाबी साडी' गाऊन संजू राठोडने वरातीत सर्वांना थिरकायला भाग पाडलं.

'गुलाबी साडी' गाण्यावर वऱ्हाड थिरकलं

अंबानींच्या लग्नातले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नाला जगभरातले सेलिब्रिटी उपस्थित होते. भारतीय संगीतविश्वातील दिग्गज गायकांनी या लग्नात त्यांचं गाणं सादर केलं. या सर्व गायकांच्या मांदियाळीत मराठमोळा गायक संजू राठोडचीही एन्ट्री झाली. संजूने गायलेल्या 'गुलाबी साडी' गाण्यावर अंबानींचं वऱ्हाड मंचावर येऊन नाचताना दिसलं. 'गुलाबी साडी' गाण्यावर सर्वांनीच जोरदार डान्स केला.

संजू राठोडची मोठी मजल

गेल्या तीन - चार महिन्यांपासून अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. अखेर १२ जुलैला दोघेही लग्नबंधनात अडकले. या लग्नात संजू राठोडला मिळणारं आमंत्रण ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. याशिवाय त्याच्या लाईव्ह परफॉर्मन्सला अंबानी कुटुंबाने आणि इतर दिग्गज लोकांनी दिलेली दाद संजूसाठी एक महत्वाची बाब आहे. इतक्या मोठ्या सोहळ्यात आपल्या लाईव्ह गाण्यावर लोक नाचत आहेत, यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट संजूसाठी कोणतीही नसू शकते.

Web Title: sanju rathod perform gulabi sadi at anant ambani wedding dance video viral