संजय दत्तचा मास्टरस्ट्रोक! २७ वर्षांपूर्वी आलेल्या 'या' सुपरहिट सिनेमाचे खरेदी केले हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 15:48 IST2026-05-06T15:47:38+5:302026-05-06T15:48:30+5:30

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच संजू बाबा बॉक्स ऑफिसवर सक्रिय असून ‘राजा साब’, ‘धुरंधर’ आणि आता ‘राजा शिवाजी’ यांसारख्या चित्रपटांतून त्याने आपल्या खलनायकी छटांनी प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे.

sanjay dutt planning to buy rights of his superhit movie vaastav released 27 years ago | संजय दत्तचा मास्टरस्ट्रोक! २७ वर्षांपूर्वी आलेल्या 'या' सुपरहिट सिनेमाचे खरेदी केले हक्क

संजय दत्तचा मास्टरस्ट्रोक! २७ वर्षांपूर्वी आलेल्या 'या' सुपरहिट सिनेमाचे खरेदी केले हक्क

बॉलिवूडचा 'खलनायक' संजय दत्त सध्या एकामागोमाग एक हिट प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. नुकतीच त्याच्या ‘खलनायक रिटर्न्स’ची पहिली झलक समोर आली असून, त्यात तो अत्यंत आक्रमक आणि थरारक अंदाजात दिसत आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच संजू बाबा बॉक्स ऑफिसवर सक्रिय असून ‘राजा साब’, ‘धुरंधर’ आणि आता ‘राजा शिवाजी’ यांसारख्या चित्रपटांतून त्याने आपल्या खलनायकी छटांनी प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. आता त्याचा ‘आखिरी सवाल’ हा सिनेमादेखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

या सर्व धावपळीत संजय दत्तने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला आणि कमालीचा गाजलेला ‘वास्तव: द रिअॅलिटी’ या कल्ट चित्रपटाचे हक्क तो विकत घेण्याच्या तयारीत आहे. १९९९ मध्ये आलेल्या या महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटाने संजय दत्तच्या करिअरला मोठी कलाटणी दिली होती. अवघ्या ७ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती.

संजय दत्त सध्या आपल्या होम प्रोडक्शन म्हणजेच ‘थ्री डायमेन्शन मोशन पिक्चर्स’चा विस्तार करण्याच्या विचारात आहे. या प्रोडक्शन हाऊसची जबाबदारी त्याची पत्नी मान्यता दत्त सांभाळत असून, यासाठी तिचे दुबई ते मुंबई असे दौरे सुरू आहेत. या प्रॉडक्शनचे नवीन कार्यालय मुंबईतील अंधेरी येथे यशराज फिल्म्स स्टुडिओजवळ सुरू करण्यात आले आहे. ‘वास्तव’प्रमाणेच संजयने सुभाष घई यांच्या ‘खलनायक’ चित्रपटाचे हक्कही यापूर्वीच मिळवले आहेत.

‘खलनायक रिटर्न्स’साठी सध्या दिग्दर्शकाचा शोध सुरू असून सुभाष घई या चित्रपटासाठी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम पाहणार आहेत. मुक्ता आर्ट्ससोबत झालेल्या बैठकीत घई यांनी स्पष्ट केले की, ते आता निर्मितीच्या मुख्य जबाबदारीतून बाजूला होऊन केवळ मार्गदर्शकाची भूमिका बजावतील. त्यामुळे आगामी काळात संजय दत्त आपल्या स्वतःच्या प्रोडक्शन बॅनरखाली जुन्या गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वेल किंवा रिमेक आणून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Web Title : संजय दत्त का मास्टरस्ट्रोक: 27 साल बाद 'वास्तव' के अधिकार खरीदे!

Web Summary : संजय दत्त अपनी प्रोडक्शन कंपनी के माध्यम से सीक्वल/रीमेक की योजना बना रहे हैं। उन्होंने 'वास्तव' के अधिकार खरीदे, यह फिल्म उनके करियर को बढ़ावा देने वाली थी। वह सुभाष घई के साथ 'खलनायक रिटर्न्स' भी विकसित कर रहे हैं।

Web Title : Sanjay Dutt's Masterstroke: Acquires Rights to 'Vaastav' After 27 Years!

Web Summary : Sanjay Dutt plans sequels/remakes via his production house. He acquired 'Vaastav' rights, a film that boosted his career. He's also developing 'Khalnayak Returns', with Subhash Ghai as creative producer, expanding his production ventures with his wife.