या मराठमोळ्या मुलीने बॉलिवूडमध्ये दिलाय हिट चित्रपट, मराठीत देखील केले आहे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 06:02 PM2021-02-08T18:02:36+5:302021-02-08T18:03:56+5:30

या अभिनेत्रीच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत.

sagarika ghatge childhood picture viral on social media | या मराठमोळ्या मुलीने बॉलिवूडमध्ये दिलाय हिट चित्रपट, मराठीत देखील केले आहे काम

या मराठमोळ्या मुलीने बॉलिवूडमध्ये दिलाय हिट चित्रपट, मराठीत देखील केले आहे काम

googlenewsNext
ठळक मुद्देसागरिकाने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. केवळ एका तासांत या फोटोला १३ हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

सागरिका घाटगेला चक्क दे इंडिया या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यामुळे तिला चक दे गर्ल असेच म्हटले जाते. सागरिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने नुकताच तिचा लहानपणीचा एक फोटो पोस्ट केला असून या फोटोत ती तिच्या कुटुंबियांसोबत दिसत आहे. सागरिकाच्या या फोटोने तिच्या फॅन्सचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. सागरिका लहानपणी देखील खूपच सुंदर दिसत होती असे तिचे फॅन्स तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

सागरिकाने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. केवळ एका तासांत या फोटोला १३ हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. 

सागरिकाचा जन्म एका शाही कुटुंबात झाला आहे. सागरिकाची आजी सीता राजे घाडगे या इंदौरच्या महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या कन्या होत्या. सागरिकाला शिक्षणा दरम्यान अनेक सिनेमा आणि जाहिरातींच्या ऑफर यायला लागल्या होत्या. मात्र तिच्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला. 'चक दे इंडिया' सिनेमाद्वारे सागरिकाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 2013 मध्ये आलेल्या रश या चित्रपटात ती इमरान हाश्मी सोबत दिसली होती.

हिंदीशिवाय सागरिकाने पंजाबी आणि मराठी सिनेमांमध्ये सुद्धा काम केले आहे. पंजाबी सिनेमा दिलदरिया तिचा खूप हिट ठरला होता. अभिनयाशिवाय सागरिका नॅशनल हॉकी प्लेअर आहे. याच कारणामुळे सागरिका 'चक दे इंडिया'त दिसली होती. सागरिकाने प्रसिद्ध क्रिकेटर झहीर खानसोबत नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्न केले. सागरिका आणि जहिरची ओळख एका कॉमन फ्रेंडनच्या माध्यमातून झाली होती. सागरिका आणि झहीर लग्न करणार असल्याच्या बातम्या २०१६ पासूनच मीडियात येत होत्या. अखेरीस त्यांनी २४ एप्रिल २०१७ मध्ये साखरपुडा केला. 

Web Title: sagarika ghatge childhood picture viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.