Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटरला राजस्थानमधून अटक, क्राईम ब्रँचची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 12:34 IST2026-02-16T12:33:11+5:302026-02-16T12:34:12+5:30
Rohit Shetty : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करणाऱ्या शूटरला पोलिसांनी अटक केली आहे.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटरला राजस्थानमधून अटक, क्राईम ब्रँचची मोठी कारवाई
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्यामुंबईतील घराबाहेर गोळीबार करणाऱ्या शूटरला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला राजस्थानमधून अटक केली असून त्याला मुंबईत आणलं जात आहे. पोलीस आजच त्याला न्यायालयात हजर करून तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे.
रोहित शेट्टीगोळीबार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अनेक संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मुंबई गुन्हे शाखेने पुणे ते मुंबईपर्यंत स्कूटी आणण्याचा 'सीन रीक्रिएट' केला. यावेळी स्वप्नील सकट, आदित्य गायकी, सिद्धार्थ येनपुरे आणि समर्थ पोमाजी या चार आरोपींना सोबत घेण्यात आलं होतं. स्कूटी खरेदी करण्यापासून ते पुण्याहून रस्तेमार्गे मुंबईत आणणं, रस्त्यात थांबण्याच्या जागा आणि विलेपार्ले स्टेशनबाहेर स्कूटी पार्क करेपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी पुन्हा पडताळून पाहिला.
रोहित शेट्टी के घर के बाहर फायरिंग की घटना | फायरिंग के सिलसिले में 6 और आरोपी गिरफ्तार। उन्हें राजस्थान से गिरफ्तार किया गया है और मुंबई लाया जा रहा है: मुंबई क्राइम ब्रांच
— ANI_HindiNews (@AHindinews) February 16, 2026
अब तक कुल 11 लोगों को गिरफ्तार किया गया है।
चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितलं की, स्कूटी मुंबईत पोहोचल्यानंतर मुख्य आरोपी शुभम लोणकर याने त्यांना आणखी ११ हजार रुपये दिले होते. सुरुवातीला पोलिसांनी ४० हजार रुपयांचा उल्लेख केला होता, मात्र तपासात एकूण ५१ हजार रुपये (३० हजार स्कूटीसाठी आणि २१ हजार खर्चासाठी) दिल्याची बाब समोर आली आहे. या संपूर्ण 'रीक्रिएशन'ची व्हिडिओग्राफी करण्यात आली असून ती पुरावा म्हणून न्यायालयात सादर केली जाईल.
रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबारानंतर शूटरने काढला पळ; CCTV फुटेज आलं समोर
सूत्रांच्या माहितीनुसार, सहावा आरोपी प्रवीण लोणकर याला पुढील २-३ दिवसांत जेलमधून ताब्यात घेतले जाईल. मुख्य शूटर आणि त्याचा साथीदार अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींवर 'मकोका' (MCOCA) अंतर्गत कारवाई केली असून तपासाला वेग दिला आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगमधील हॅरी बॉक्सरकडून रणवीर सिंह, रोहित शेट्टीला धमकी; ऑडिओ व्हायरल
ना लोकेशन, ना कॉलिंग... नवी मोडस ऑपरेंडी; रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणारे फरार
रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. घटनेनंतर पळून जाणाऱ्या शूटरचे नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये गोळीबार केल्यानंतर शूटर वेगाने तिथून निघून जाताना स्पष्ट दिसत आहे. १ फेब्रुवारी रोजी पहाटे घडलेल्या या घटनेनंतर, मुंबई पोलिसांना विलेपार्ले पश्चिम येथील एका हॉटेलजवळ एक स्कूटर सापडली होती. हे ठिकाण 'शेट्टी टॉवर'पासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर आहे. गोळीबारानंतर आरोपी याच स्कूटरने पळाला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
सिग्नल App अन् पुण्याचं कनेक्शन; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा
सुरुवातीच्या तपासात असंही समोर आले आहे की, स्कूटरवरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले, ज्यांनी घटनास्थळावरून ठसे (फिंगरप्रिंट्स), डीएनए आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा केले. तपासादरम्यान असे समजलं की, ही जुनी (सेकंड हँड) स्कूटर पुण्याच्या कर्वेनगर भागात राहणाऱ्या अमन मरोटे याच्याकडून खरेदी करण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, १९ वर्षीय आदित्य गायकी याने ही स्कूटर खरेदी केली होती.