'हम आपके है कौन' पाहून रेणुका शहाणेंचा मुलगा दिग्दर्शकावर संतापला, म्हणाला-"मी जर त्यांना भेटलो, तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:00 IST2025-10-04T11:54:41+5:302025-10-04T12:00:56+5:30
'हम आपके है कौन' (Hum Aapke Hain Koun) या चित्रपटातील रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांनी साकारलेली 'पूजा भाभी' आजही लोकांच्या मनात घर करून आहे. पण, जेव्हा त्यांच्याच मुलाने हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला, तेव्हा त्याची प्रतिक्रिया खूपच मजेशीर होती.

'हम आपके है कौन' पाहून रेणुका शहाणेंचा मुलगा दिग्दर्शकावर संतापला, म्हणाला-"मी जर त्यांना भेटलो, तर..."
'हम आपके है कौन' (Hum Aapke Hain Koun) हा चित्रपट म्हणजे ९० च्या दशकातील एक अविस्मरणीय सिनेमा. या चित्रपटातील रेणुका शहाणे यांनी साकारलेली 'पूजा भाभी' आजही लोकांच्या मनात घर करून आहे. पण, जेव्हा रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांच्याच मुलाने हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला, तेव्हा त्याची प्रतिक्रिया खूपच मजेशीर होती.
अमुकतमुकला युट्यूब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत रेणुका शहाणे यांनी हा खास किस्सा सांगितला. चित्रपटात पूजा (रेणुका शहाणे) पायऱ्यांवरून पडून मरते, तो मृत्यूचा प्रसंग पाहून त्यांच्या मुलाचे मन हेलावले. आपली आई पडद्यावर मरताना पाहून तो खूप अस्वस्थ झाला आणि त्याचा राग थेट दिग्दर्शकांवर म्हणजेच सूरज बडजात्या यांच्यावर निघाला. रेणुका शहाणे यांनी सांगितलं की, "मुलांच्या शाळेत माझ्या मुलांचे मित्र त्यांना तुझी मम्मी एक्ट्रेस आहे. तर ते म्हणाले नाही. माझी मम्मी अॅक्स्ट्रेस नाही. माझे बाबा अॅक्टर आहेत. माझी मम्मी मम्मी आहे. खूपच लहान होते त्यामुळे मी त्यांना कुठे सांगत बसणार अगदी की एकेकाळी मी अगदी. त्यामुळे खूप नंतर उशीरा त्यांना कळलं. मग ते म्हणाले तू एक 'हम आपके है कौन' नावाचा चित्रपट त्याच्यात तू आहेस. म्हटलं हो लावून दाखवलं त्यांना. मला बघून ते म्हणाले काहीतरी वेगळीच दिसतेस. आम्हाला बघायची इच्छा नाही. त्यामुळे ते लहान होते तेव्हा त्यांनी हम आपके है कौन पाहिलीच नाही."
"मी जर त्यांना भेटलो, तर..."
त्यांनी पुढे सांगितले की, "मग नंतर जरा मोठे झाले तेव्हा त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांना चिडवलं की तुम्ही हम आपके है कौन पाहिलं नाहीयेत. तुम्हाला ही गाणी माहिती नाही. वेड्यात काढल्यामुळे त्यांनी मग ती पाहिली. ती पाहिली तेव्हा माझा मोठा मुलगा म्हणाला या दिग्दर्शकाला मी भेटलो तर मी मारेन. त्यांनी माझा मम्माला का मारलं?"