... म्हणून रणवीर सिंगनं हटवले लग्नाचे फोटो, अभिनेत्याच्या टीमने सांगितलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 11:34 IST2024-05-08T11:34:08+5:302024-05-08T11:34:55+5:30

अखेर लग्नाचे फोटो हटवण्यामागचं यामागचं खरं कारण समोर आलं आहे.

Ranveer Singh Shares Clarification About Removing Wedding Pictures With Deepika Padukone | ... म्हणून रणवीर सिंगनं हटवले लग्नाचे फोटो, अभिनेत्याच्या टीमने सांगितलं खरं कारण

... म्हणून रणवीर सिंगनं हटवले लग्नाचे फोटो, अभिनेत्याच्या टीमने सांगितलं खरं कारण

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) लवकरच आई-बाबा होणार आहेत.  अशातच रणवीरच्या एका कृतीने दोघांमध्ये दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्याने लग्नाचे फोटो सोशल मीडियावरुन हटवले आहेत. रणवीर सिंगने दीपिका पादुकोणसोबचे फोटो हटवल्याने चाहते आश्चर्यचकित झाले होते. अखेर लग्नाचे फोटो हटवण्यामागचं खरं कारण समोर आलं आहे.

सोशल मीडियावरुन लग्नाचे फोटो नेमके का हटवले याविषयी रणवीर सिंगच्या टीमकडून स्पष्टीकरण समोर आले आहे. 'दीपवीर'मध्ये सारं काही आलबेल असून हा त्यांच्या सोशल मीडिया व्यवस्थापन धोरणाचा भाग आहे. रणवीर सिंगचे २०२३ पूर्वीचे सर्व फोटो आणि पोस्ट या इन्स्टाग्रामवरुन डिलीट न करता, अर्काइव्ह करण्यात आल्या आहेत. यात त्याच्या लग्नाच्या फोटोंचा समावेश आहे. त्यामुळे दीपवीरच्या चाहत्यांना काळजी करण्याचे काहीही कारण नाही.

दीपिका सध्या प्रेग्नन्सी काळ एन्जॉय करत आहे. अलिकडेच तिचे काही व्हिडीओ-फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यात पहिल्यांदाच तिचा बेबीबंप दिसून येतो आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह 'राम लीला' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीमध्ये ते लग्नबंधनात अडकले. आता लग्नाच्या पाच वर्षांनी दीपवीरने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
 

Web Title: Ranveer Singh Shares Clarification About Removing Wedding Pictures With Deepika Padukone