डोक्यावर ग्लास ठेऊन रणबीर-आलियाने केला 'जमालकुडू'वर जबरदस्त डान्स; video viral
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 12:56 IST2024-01-29T12:56:09+5:302024-01-29T12:56:51+5:30
Ranbir-alia: या दोघांनीही 'जमालकुडू'मधील बॉबी देओलची हूक स्टेप कॉपी केली.

डोक्यावर ग्लास ठेऊन रणबीर-आलियाने केला 'जमालकुडू'वर जबरदस्त डान्स; video viral
नुकताच गुजरातच्या गांधीनगरमध्ये फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. या संपूर्ण सोहळ्यात उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं ते अभिनेता रणबीर कपूर आणि अलिया भट्ट या जोडीने. रणबीरने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यावर आपली मोहर उमटवली आहे. रणबीरला Animal या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे त्याच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामध्येच या सोहळ्यातील रणबीर आणि आलिया यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क आलियाने जमालकुडू या गाण्यावर डान्स केला आहे.
सोशल मीडियावर सध्या रणबीर आणि आलिया यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर आणि आलिया यांनी animal या सिनेमातील गाजलेल्या जमालकुडू या गाण्यावर ताल धरल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही यावेळी बॉबी देओलची या गाण्यातील हूक स्टेप कॉपी केली. या जोडीने डोक्यावर काचेचा ग्लास ठेऊन डान्स केला.
दरम्यान,फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रणबीरने जमालकुडू या गाण्यावर परफॉर्म करत होता. यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आलियाकडे त्याचं लक्ष गेलं आणि तो पटकन स्टेजवरुन खाली उतरला आणि तिच्यासोबत नाचू लागला. विशेष म्हणजे आलियाने सुद्धा यावेळी त्याला साथ दिली. या जोडीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे.