घटस्फोटानंतर लेकीचं वाजत-गाजत केलं स्वागत, राकेश बेदी व्हिडीओ शेअर करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 10:32 IST2026-04-24T08:58:28+5:302026-04-24T10:32:03+5:30

राकेश बेदी यांनी एका संवेदनशील विषयावर भाष्य केलंय. 

Rakesh Bedi Reacts To Up Father Welcoming Divorced Daughter With Band Baaja | घटस्फोटानंतर लेकीचं वाजत-गाजत केलं स्वागत, राकेश बेदी व्हिडीओ शेअर करत म्हणाले...

घटस्फोटानंतर लेकीचं वाजत-गाजत केलं स्वागत, राकेश बेदी व्हिडीओ शेअर करत म्हणाले...

आदित्य धर यांचा ब्लॉकबस्टर 'धुरंधर: द रिव्हेंज' हा सिनेमा रिलीज झाल्यापासून तुफान गाजतोय. सिनेमातील प्रत्येक भूमिकेचं, त्यातील कलाकारांचं सोशल मीडियावर कौतुक होतंय. यातील एका भूमिकेला तर प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय ही भूमिका म्हणजे जमील जमाली. अभिनेता राकेश बेदी यांनी साकारलेली भूमिका पडद्यावर तुफान गाजली. यामुळे सध्या सगळीकडे राकेश बेदी यांची चर्चा आहे. यातच राकेश बेदी यांनी एका संवेदनशील विषयावर भाष्य केलंय. 

भारतीय समाजात आजही मुलीचा घटस्फोट होणे ही गोष्ट दुःखद मानली जाते. मात्र, उत्तर प्रदेशातील एका पित्याने या जुन्या विचारसरणीला फाटा दिला आहे. मुलीचा घटस्फोट झाल्यानंतर दुःख व्यक्त करण्याऐवजी, तिचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात, पेढे वाटून आणि फटाके फोडून स्वागत केले.  एका वडिलांनी आपल्या लेकीच्या पाठीशी अशा प्रकारे खंबीरपणे उभे राहणे, ही गोष्ट राकेश बेदी यांना भावली.

राकेश बेदी व्हिडीओ शेअर करत म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून जगात अनेक घडामोडी सुरू आहेत. इराण, अमेरिका आणि इस्रायलमधील तणाव, तसेच आयपीएलही सुरू आहे. पण या सगळ्यात एक बातमी मला खूप आनंद देऊन गेली. यूपीमध्ये एका वडिलांनी घटस्फोटानंतर घरी परतलेल्या आपल्या मुलीचं बँड-बाजासह, मिठाई वाटून, लोकांना जमवून अतिशय धूमधडाक्यात स्वागत केलं. ही खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि आपल्यासाठी मोठा धडा आहे".

ते पुढे म्हणाले, "आपल्या देशात एखाद्या मुलीचा घटस्फोट झाला म्हणजे तिचं आयुष्य संपलं असं होत नाही. उलट अशा वेळी तिला आधार देणं, पुन्हा उभं राहायला मदत करणं गरजेचं आहे". 'धुरंधर'च्या अफाट यशानंतर राकेश बेदी कोणता नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार, याची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. ते सध्या हैदराबादमध्ये एका आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. या प्रोजेक्टचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे.


 

Web Title : तलाक के बाद बेटी का धूमधाम से स्वागत; राकेश बेदी ने साझा किया वीडियो

Web Summary : राकेश बेदी ने उत्तर प्रदेश की एक दिल छू लेने वाली कहानी को उजागर किया, जहाँ एक पिता ने अपनी बेटी के तलाक के बाद घर लौटने पर संगीत, मिठाई और धूमधाम से स्वागत किया, जो सामाजिक मानदंडों को चुनौती देता है और ऐसी स्थितियों में महिलाओं के लिए समर्थन पर जोर देता है।

Web Title : Father celebrates daughter's divorce with joy; Rakesh Bedi shares video.

Web Summary : Rakesh Bedi highlights a heartwarming story from Uttar Pradesh where a father celebrated his daughter's return home after her divorce with music, sweets, and fanfare, challenging societal norms and emphasizing support for women in such situations.