"शर्टलेस होऊन कधीच कोणाच्या बेडवर..."; आर. माधवनने मुलाला दिला होता 'हा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:53 IST2026-04-16T09:53:22+5:302026-04-16T09:53:47+5:30

R. madhavan: वेदांत एक उत्तम स्विमर असून त्याने अनेक स्पर्धांमध्ये भारताचं नाव उंचावलं आहे. त्यामुळे वेदांतने क्रिडाविश्वात त्याची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

r-madhavan-told-son-vedaant-do-not-show-up-shirtless-in-anyone-bed-your-life-will-be-full-of-privilege | "शर्टलेस होऊन कधीच कोणाच्या बेडवर..."; आर. माधवनने मुलाला दिला होता 'हा' सल्ला

"शर्टलेस होऊन कधीच कोणाच्या बेडवर..."; आर. माधवनने मुलाला दिला होता 'हा' सल्ला

१९ मार्च रोजी रिलीज झालेल्या धुरंधर २ या सिनेमात आर. माधवन याने साकारलेली भूमिका बॉक्स ऑफिसवर बरीच गाजली. या सिनेमात त्याने अजय सान्याल ही भूमिका वठवली आहे. साऊथसह बॉलिवूडमध्येही लोकप्रिय असलेला माधवन याने यश, प्रसिद्धी, संपत्ती कमावूनदेखील तो अत्यंत साधेपणाने त्याचं आयुष्य जगतो. त्यामुळे त्याच्या या साधेपणाची कायमच चर्चा होत असते. विशेष म्हणजे त्याने त्याचे हेच संस्कार त्याच्या लेकामध्येही रुजवले आहेत. सध्या सोशल मीडियावर त्याची एक जुनी मुलाखत चर्चिली जात आहे. वेदांतला प्रसिद्धी मिळत असतांना तो यात हुरळून जाऊ नये, यासाठी माधवनने त्याला काही सल्ले दिले होते. याविषयी त्याने या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.

वेदांत एक उत्तम स्विमर असून त्याने अनेक स्पर्धांमध्ये भारताचं नाव उंचावलं आहे. त्यामुळे वेदांतने क्रिडाविश्वात त्याची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे वेदांतला प्रसिद्धी मिळत असतांना तो यात वाहत जाऊ नये. त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी माधवनने त्याला सल्ला दिला होता. तसंच त्याच्या एका चुकीच्यानिर्णयामुळे त्याच्या करिअरवर आणि इमेजवर त्याचा कसा परिणाम होईल हेदेखील त्याने सांगितलं होतं.

नेमकं काय म्हणाला होता माधवन

''तू शर्टलेस होऊन कधीच कोणाचा बेडवर झोपू शकत नाहीस. कारण, तुझा तो एक फोटो राष्ट्रीय बातमीचा विषय ठरु शकतो. तू तुझ्या मित्रांप्रमाणे बेफिक्रीने वागू शकत नाहीस'', असं माधवनने त्याला सांगितलं होतं.

पुढे तो म्हणतो, मला माझ्या लेकाला सांगावं लागलं होतं. की दुर्भाग्याने असो वा सौभाग्याने तुला जे आयुष्य मिळालं आहे ते स्पेशलच असेल कारण, तू माझा मुलगा आहेस. दरम्यान, माधवनचा लेक इंडस्ट्रीपासून दूर असला तरीदेखील क्रिडाविश्वात त्याने बरंच यश मिळवलं आहे. वेदांत एक उत्तम स्विमर असून त्याने मलेशियाई ओपनमध्ये ५ गोल्ड मेडल, डॅनिश ओपनमध्ये १ गोल्ड आणि सिल्व्हर मेडल मिळवलं आहे. इतकंच नाही तर त्याने लातवियाईन ओपन आणि थायलँड ओपनमध्येही ब्राँझ मेडल मिळवलं आहे. विशेष म्हणजे त्याने Commonwealth Youth Games मध्येही पाचव स्थान पटकावलं आहे.

माधवन लवकरच एका सायको थ्रिलर सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तो कंगना रणौतसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमातं दिग्दर्शन ए.एल. विजय करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Web Title : आर. माधवन ने बेटे को दी सलाह: 'कभी भी किसी के बिस्तर पर शर्टलेस नहीं'।

Web Summary : आर. माधवन ने अपने बेटे वेदांत, जो एक सफल तैराक हैं, को अपनी सार्वजनिक छवि के प्रति सचेत रहने की सलाह दी। उन्होंने चेतावनी दी कि उनकी प्रसिद्धि के कारण एक हानिरहित तस्वीर भी राष्ट्रीय खबर बन सकती है।

Web Title : R. Madhavan's advice to his son: 'Never shirtless on anyone's bed'.

Web Summary : R. Madhavan advised his son, Vedant, a successful swimmer, to be mindful of his public image. He cautioned him that even a seemingly harmless photo could become national news due to his fame.