अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' ला लागला ब्रेक?; चित्रीकरण मध्यावर रखडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 11:53 IST2022-08-03T11:52:49+5:302022-08-03T11:53:38+5:30
Pushpa 2: फायर म्हणत तुफान गाजलेल्या या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे या चित्रपटाचा पुढील भाग ' पुष्पा 2' (pushpa 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' ला लागला ब्रेक?; चित्रीकरण मध्यावर रखडलं
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (allu arjun) याच्या 'पुष्पा' (pushpa) या चित्रपटाने सर्वच भाषांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. फायर म्हणत तुफान गाजलेल्या या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे या चित्रपटाचा पुढील भाग ' पुष्पा 2' (pushpa 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. मात्र, आता हे शुटिंग मध्येच थांबलं आहे.
'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, तेलुगू सिनेसृष्टीत सध्या संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाचं चित्रीकरण अर्ध्यावर रखडलं आहे. हा संप संपल्यानंतर पुन्हा एकदा ' पुष्पा 2' च्या चित्रीकरणाला सुरुवात होईल.
' पुष्पा 2' मध्ये अल्लू अर्जुन पुन्हा एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. अलिकडेच त्याचा या सिनेमातील एक फोटोही व्हायरल झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपट २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या कथेमध्ये काही मुलभूत बदल करण्यात आले आहेत.