​प्रियंका-शाहीदने केले सगळ्यांनाच अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 17:19 IST2016-06-27T11:49:37+5:302016-06-27T17:19:37+5:30

प्रियंका चोपडा व शाहीद कपूर एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. मात्र अचानक त्यांचे मार्ग बदलले. प्रियंकानेच ...

Priyanka-Shahid did not make everyone wonder! | ​प्रियंका-शाहीदने केले सगळ्यांनाच अवाक्!

​प्रियंका-शाहीदने केले सगळ्यांनाच अवाक्!

रियंका चोपडा व शाहीद कपूर एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. मात्र अचानक त्यांचे मार्ग बदलले. प्रियंकानेच शाहीदला सोडले, असे मानले जाते. मात्र खरे काय, ते कधीही समोर आले नाही.पण एक मात्र खरे,त्यानंतर प्रियंका व शाहीद कधीही एकत्र दिसले नाही.   सार्वजनिक व्यासपीठावर तर नाहीच नाही...पण अलीकडे स्पेनमध्ये आयोजित आयफा अवार्ड्समध्ये प्रियंका व शाहिद समोरासमोर आलेच. अर्थात आधी दोघांनीही परस्परांकडे दुर्लक्ष करण्याचेच प्रयत्न केलेत. मात्र काही क्षणांनंतर त्यांचे स्टेजवर वागणे बघून सगळेच अवाक झाले. अवार्ड घेतल्यानंतर प्रियंका स्टेजवर निघत असतानाच तिने शाहीदला हग केले. झाले गेले सगळे विसरून शाहीद व प्रियंका एकमेकांना हग करताना दिसले. यापूर्वीही ‘उडता पंजाब’ लीक झाली होती तेव्हा प्रियंकाने टिष्ट्वट करून चाहत्यांना हा चित्रपट बघा, अशी विनंती केली होती. यानंतर शाहीदने प्रियंकाचे खास आभारही मानले होते..

Web Title: Priyanka-Shahid did not make everyone wonder!