​प्रियांका चोप्राची ही ताजी पोस्ट नव्या प्रोजेक्टचे संकेत तर नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 14:54 IST2017-12-05T09:24:49+5:302017-12-05T14:54:49+5:30

प्रियांका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे आणि ‘क्वांटिको3’ या अमेरिकन सीरिजच्या शूटींगमध्ये बिझी आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. पण इतक्या ...

Priyanka Chopra's latest post is not a new project? | ​प्रियांका चोप्राची ही ताजी पोस्ट नव्या प्रोजेक्टचे संकेत तर नाही?

​प्रियांका चोप्राची ही ताजी पोस्ट नव्या प्रोजेक्टचे संकेत तर नाही?

रियांका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे आणि ‘क्वांटिको3’ या अमेरिकन सीरिजच्या शूटींगमध्ये बिझी आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. पण इतक्या बिझी शेड्यूलमधूनही पीसी आपल्या चाहत्यांसाठी वेळ काढतेच काढते. कितीही बिझी असली तरी प्रियांका सोशल मीडियावर स्वत:चे डे टू डे लाईफचे फोटो शेअर करत असते. आत्ताही प्रियांकाने तेच केलेय. होय, इन्स्टाग्रामवर पीसीने एक ताजा फोटो पोस्ट केला आहे. पण पीसीचा हा फोटो पाहून अनेकांची उत्सुकता वाढली आहे. होय, म्हणजे खुद्द प्रियांकानेच ती वाढवली आहे. पीसीने या फोटोला दिलेले कॅप्शन पाहून सगळेच संभ्रमात पडले आहेत. ‘Mood. Stepping out of the box #NYCLife’ , असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. आता हे कॅप्शन प्रियांकाच्या भविष्यातील नव्या योजनेचे संकेत तर नाहीत ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.


ALSO READ :​ लांबसडक केस कापल्यानंतरचा प्रियांका चोप्राचा नवा लूक तुम्ही पाहिलातं?

प्रियांकाची सध्या ज्याप्रमाणे घोडदौड सुरु आहे, त्यावरून तरी प्रियांकासाठी काहीही कठीण नाही, ही खात्री सगळ्यांनाच पटली आहे. त्यामुळेच पीसीच्या या पोस्टचा अर्थ काढण्यात सगळे गुंतले आहेत. आता नवा प्रोजेक्ट पीसीचा नवा सिनेमा आहे की एखादा मानवतावादी उपक्रम आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. कदाचित पीसी आपल्या बॉलिवूड प्रोजेक्टची घोषणा करू इच्छित असेल? अर्थात हे सगळे तर्क आहेत. पीसीला या पोस्टमधून नेमके काय सांगायचेयं हे तिलाच ठाऊक़ पण लोक पीसीच्या मनातले गुपित जाणून घेण्यास उत्सूक आहेत,हे मात्र नक्की.
‘क्वांटिको3’च्या दोन्ही सीझनमध्ये प्रियांका एलेक्स पारिशची भूमिका साकारताना दिसली होती. ‘क्वांटिको3’तील प्रियांकाची भूमिका जगभरातील लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती.  याच भूमिकेने प्रियांकाला हॉलिवूडमध्ये नवी ओळख दिली. कोट्यवधी लोकांची मने तिने जिंकलीत. यानंतर एकापाठोपाठ एक हॉलिवूड सिनेमेही तिला मिळालेत. 



Web Title: Priyanka Chopra's latest post is not a new project?