लंडनच्या रस्त्यावर प्रियंका चोप्राने केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून म्हणाल WOW!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 08:00 AM2021-02-04T08:00:00+5:302021-02-04T08:00:02+5:30

चर्चा आहे प्रियंकाच्या ताज्या फोटोशूटची.

priyanka chopra jonas featured on the cover of leading magazine elle uk | लंडनच्या रस्त्यावर प्रियंका चोप्राने केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून म्हणाल WOW!

लंडनच्या रस्त्यावर प्रियंका चोप्राने केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून म्हणाल WOW!

googlenewsNext
ठळक मुद्देया फोटोशूटमध्ये प्रियंका लंडनच्या रस्त्यावर दिसतेय. लंडनच्या रस्त्यावर तिने एकापेक्षा एक भारी पोज दिल्या आहेत.

प्रियंका चोप्रा आता केवळ अभिनेत्री, निर्मातीच नाही तर लेखिका सुद्धा बनलीये. लवकरच तिचे आत्मचरित्र प्रकाशित होतेय. त्याआधी चर्चा आहे ती प्रियंकाच्या ताज्या फोटोशूटची. होय, Elle मॅगझिनसाठी प्रियंकाने नुकतेच एक फोटोशूट केले. या फोटोशूटचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

या फोटोशूटमध्ये प्रियंका लंडनच्या रस्त्यावर दिसतेय. लंडनच्या रस्त्यावर तिने एकापेक्षा एक भारी पोज दिल्या आहेत. मार्चच्या Elle च्या अंकात   मिस वर्ल्ड ते स्टार बनण्यापर्यंतचा पीसी प्रवास चाहत्यांना वाचायला मिळणार आहे.

प्रियंकाचे ‘अनफिनिश्ड’ हे आत्मचरित्र लवकरच बाजारात येतेय. सध्या हे पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामात पीसी बिझी आहे. काही दिवसांपूर्वी या पुस्तकांच्या काही प्रतींवर ती स्वाक्षरी करताना दिसणार आहे.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा ‘टेक्स्ट फॉर यू’ हा हॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे शूटींग तिने संपवले. याआधी ती ‘वी कॅन बी हिरोज’ या हॉलिवूडपटात दिसली होती.  

प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनास दोघेही संसारात आनंदी आहेत. 2018 मध्ये प्रियंका व निक लग्नबेडीत अडकले होते. हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने दोघांनीही लग्नगाठ बांधली होती.

प्रियंका पतीपेक्षा 11 वर्षांनी मोठी आहे. शिवाय प्रॉपर्टीच्या बाबतीतही ती निकच्या कितीतरी पुढे आहे. प्रियंका सुमारे 200 कोटींच्या प्रॉपटीर्ची मालकीन आहे. तर निककडे 175 कोटींची प्रॉपर्टी आहे. प्रियंका आणि निक दोघांनाही लक्झरी लाईफ आवडते. दोघांकडेही महागड्या गाड्या आहेत, अलिशान बंगले आहेत.

Web Title: priyanka chopra jonas featured on the cover of leading magazine elle uk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.