OMG! होणाऱ्या वहिनीला प्रियंका चोप्राने इन्स्टाग्रामवरुन केले अनफॉलो ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 12:54 IST2019-05-03T12:47:48+5:302019-05-03T12:54:20+5:30

गेल्या काही दिवसांपासून प्रियंका चोप्राच्या भावाच्या लग्नाचा विषय सध्या बी-टाऊनमध्ये हॉट टॉपिक आहे. 27 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि इशिता कुमार यांची रोका सेरिमनी झाली.

Priyanka chopra brother siddharth chopra unfollow his fiance ishita kumar on instagram | OMG! होणाऱ्या वहिनीला प्रियंका चोप्राने इन्स्टाग्रामवरुन केले अनफॉलो ?

OMG! होणाऱ्या वहिनीला प्रियंका चोप्राने इन्स्टाग्रामवरुन केले अनफॉलो ?

ठळक मुद्देभावाच्या लग्नासाठी प्रियंका मुंबईत आली देखील होती प्रियंका आणि सिद्धार्थने इन्स्टाग्रामवरुन इशिताला अनफॉलो केले आहे

गेल्या काही दिवसांपासून प्रियंका चोप्राच्या भावाच्या लग्नाचा विषय सध्या बी-टाऊनमध्ये हॉट टॉपिक आहे. 27 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि इशिता कुमार यांची रोका सेरिमनी झाली. मात्र ऐनवेळी लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे आणि यावरुन तर्कवितर्क काढण्यात आले आहेत. भावाच्या लग्नासाठी प्रियंका मुंबईत आली देखील होती. मात्र लग्न पुढे ढकलण्यात आल्यामुळे प्रियंका न्यूयॉर्कला परतली.  

आजतकच्या रिपोर्टनुसार  इशिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लग्ना संबंधीत सगळे फोटो डिलीट केले आहेत. यात रोका सेरिमनीचे फोटोदेखील होते. तर दुसरीकडे प्रियंका आणि सिद्धार्थने इन्स्टाग्रामवरुन इशिताला अनफॉलो केले आहे. इशिताने ही आपले इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केले आहे. 

इशिता आणि सिद्धार्थचे लग्न एप्रिलच्या अखेरिस होणार होते. यानंतर अशी माहिती मिळाली की इशिताच्या इमर्जेंसी सर्जरीमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली. याच दरम्यान अचानक इशिताने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केले आहे ऐवढेच नाही तर सिद्धार्थसोबतचे तिचे सगळे फोटो डिलीट केल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. आता हे नेमकं काय प्रकरण आहे याचे उत्तर आपल्याला वेळ आल्यावरच मिळेल. प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या होणाऱ्या सुनेचे फोटो डिलीट केले आहेत.  याआधी ही एकदा सिद्धार्थचा साखरपुडा एकदा मोडला होता

Web Title: Priyanka chopra brother siddharth chopra unfollow his fiance ishita kumar on instagram