प्रियंकाने मानले करिनाचे आभार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 09:31 IST2016-07-01T04:01:51+5:302016-07-01T09:31:51+5:30

 प्रियंका चोप्राने केलेल्या हॉलीवूड एन्ट्रीनंतर तिला एकामागोमाग चित्रपटांची लॉटरीच लागली. ‘क्वांटिको’ आणि ‘बेवॉच’ नंतर तिचे बॉलीवूडसोबतच हॉलीवूडमध्ये प्रचंड नाव ...

Priyanka believed to be thanked! | प्रियंकाने मानले करिनाचे आभार !

प्रियंकाने मानले करिनाचे आभार !

 
्रियंका चोप्राने केलेल्या हॉलीवूड एन्ट्रीनंतर तिला एकामागोमाग चित्रपटांची लॉटरीच लागली. ‘क्वांटिको’ आणि ‘बेवॉच’ नंतर तिचे बॉलीवूडसोबतच हॉलीवूडमध्ये प्रचंड नाव गाजले. ‘बी टाऊन’ च्या अनेक सेलिब्रिटींनीही तिचे कौतुक केले.

आता यात करिना कपूर खानही मागे राहिली नाही. तिने म्हणे नुकतेच प्रियंकाचे तिच्या कामाची नोंद घेऊन कौतुक केले आहे. त्यानंतर ती म्हणते,‘माझा लॉस एंजलिसला जाण्याचा काहीही प्लॅन नाही आणि मी विवाहीत असल्याने हॉलीवूड चित्रपटांना प्राधान्य देणार नाही.’

बेबोच्या कौतुकावर पीसी म्हणाली,‘ माझ्या कामाची नोंद तू घेतल्याने मला फारच प्रोत्साहन मिळाल्यासारखे वाटते आहे. करिनाने माझं काम पाहिलं हे माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे. ’

Web Title: Priyanka believed to be thanked!