३ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिली अन् फसली! ४० व्या वर्षीही सिंगल आहे बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर; सांगितलं लग्न न करण्यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 09:07 IST2026-04-14T09:06:05+5:302026-04-14T09:07:33+5:30
शक्ती मोहन वयाच्या चाळिशीतही अविवाहित; लग्न न करण्यामागचं कारण काय? स्वत:च केला मोठा खुलासा

३ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिली अन् फसली! ४० व्या वर्षीही सिंगल आहे बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर; सांगितलं लग्न न करण्यामागचं कारण
Shakti Mohan:बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यांगना, कोरिओग्राफर आणि अभिनेत्री शक्ती मोहनला कोणत्याही हे इंडस्ट्रीतील नावाजलेलं नाव आहे. २००९ मध्ये 'डान्स इंडिया डान्स २' या रिॲलिटी शोमधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. शक्तीचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे. शक्तीने आतापर्यंत अनेक डान्स रिअॅलिटी शो जज केले आहेत. ती सध्या भारतातील आघाडीची डान्सर व कोरिओग्राफर्सपैकी एक आहे. शक्ती मोहन सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तीच्या एखाद्या परफॉर्मन्समुळे नव्हे, तर तिने तिच्या आयुष्यातील काही अतिशय वैयक्तिक आणि वेदनादायक अनुभव उघडपणे मांडले आहेत.
सध्या शक्ती मोहन तिच्या खासगी आयुष्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.तसंच शक्तीने लग्नाविषयी मोठं विधान केलं आहे. अलिकडेच सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये शक्ती म्हणाली,"बरेच लोक मला लग्नाबद्दल विचारतात. काल माझ्या वडिलांनी मला विचारलं की, तुझ्या आयुष्यात कोणी आहे का? शिवाय माझ्या आईला वाटतं की कमीत कमी माझा बॉयफ्रेंड तरी असावा.पण, मला मला माझ्या कामात आणि स्टुडिओ चालवण्यात इतकी मजा येत आहे की, मला कशाचीही उणीव भासत नाही."
पुढे शक्ती म्हणाली, समाजाचा असा विश्वास आहे की आयुष्यात कोणीतरी असणं आवश्यक आहे. आता माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी सुरु आहे, घडतंय त्यात मी आनंदी आहे. जर मला चांगला जोडीदार मिळाला, तर मी नकार देणार नाही, पण जेव्हा कोणीच नाही, तेव्हा मी तसा विचार तरी का करु? याचदरम्यान, शक्तीने मातृत्वाबद्दल सांगितलं, "मी मोठी आत्या आणि माझ्या भाच्यासाठी सर्वात खास व्यक्ती आहे, पण तरीही मला आई व्हावं किंवा मुलं असावीत असं वाटत नाही.मला स्वतःला मुलं नको आहेत."
शक्ती मोहन रिलेशनशिपबद्दल काय म्हणाली?
या मुलाखतीत शक्ती पहिल्यांदाच तिच्या भूतकाळातील रिलेशनशिपबद्दल उघडपणे बोलली, तिने म्हटलं,"मी एका रिलेशनशिपमध्ये माझा विश्वासघात झाला. त्यानंतर मी ते नातं लगेच तोडलं. पण माझ्या आईने मला सांगितलं की, तो चांगला मुलगा होता, आमचं तीन वर्षांचं नातं होतं आणि मी ते विसरून जावं. ती म्हणाली की मुलं अशीच असतात. पण तिला तेव्हाच स्पष्टपणे सांगितलं, मी माझ्या आयुष्यात ही गोष्ट स्वीकारणार नाही. जर मुलं अशीच असतील, तर मला ती माझ्या आयुष्यात नको.'
"मी अनेक महिने रडत होते, ते माझी आईने देखील पाहिलं आहे. तेव्हा फसवणूक ही काय असते याबद्दल मला माहित नव्हतं. जेव्हा कोणी तुमची फसवणूक करतं, तेव्हा तुम्ही ते विसरू शकत नाही आणि तुम्ही सगळ्यांवर संशय घेता. माझ्या बॉयफ्रेंडला मी फसवणूक करताना पकडलेलं. तेव्हा मी त्याला त्याबद्दल विचारलं, तेव्हा त्यानं नकार दिला. त्यानंतर तो अनेकदा माफी मागण्यासाठी घरी आला, पण मी त्याला माफ केलं नाही." असं शक्तीनं यावेळी सांगितलं.