"मला एकटं सोडा प्लीज..."; आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी मीडियावर भडकली; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 14:15 IST2025-10-31T14:12:03+5:302025-10-31T14:15:15+5:30
आमिर खानची गर्लफ्रेंड गौरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ती मीडियावर चांगलीच भडकताना दिसतेय

"मला एकटं सोडा प्लीज..."; आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी मीडियावर भडकली; व्हिडीओ व्हायरल
अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. विशेषतः आमिरची गर्लफ्रेंड गौरी स्प्राट (Gauri Spratt) हिच्यासोबतचे त्याचे संबंध गेल्या काही दिवसांपासून नेहमीच माध्यमांचं लक्ष वेधून घेत आहेत. नुकतंच गौरीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात फोटोग्राफर्सनी तिचा पाठलाग केल्यामुळे ती नाराज झाल्याचे दिसत आहे.
नेमका काय आहे प्रकार?
आमिर खान आणि गौरी स्प्राट यांनी काही महिन्यांपूर्वी एकमेकांच्या नात्याची जाहीर कबूली दिली. गौरी ही आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करते आणि अनेकदा ती आमिरसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गौरी स्प्राट एका ठिकाणाहून बाहेर पडताना दिसत आहे. त्यावेळी अनेक फोटोग्राफर्स तिचा पाठलाग करत तिचे फोटो क्लिक करू लागतात. यामुळे ती खूप अस्वस्थ आणि नाराज झाली. ''तुम्ही येता कुठून सर्व? माझा पाठलाग करु नका, मला एकटं सोडा'', अशा शब्दात तिने पापाराझींना चांगलंच सुनावलं.
गौरीच्या या व्हिडीओनंतर नेटिझन्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी गौरीला 'सेलिब्रेटी' नसल्यामुळे तिची प्रायव्हसी जपण्याचा सल्ला फोटोग्राफर्सना दिला आहे, तर काहींनी ‘जेव्हा तुम्ही आमिर खानसोबत असता, तेव्हा हे सर्व होणारच,’ असे म्हटले आहे. आमिर खान आणि गौरीने अद्यापही त्यांच्या संबंधांवर अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, दोघांनी एकमेकांवरील प्रेमाची कबूली दिल्याने ते चर्चेत असतात.
